तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:26 PM2018-10-30T16:26:34+5:302018-10-30T16:30:34+5:30

तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे.

Tula pahate re fame Subodh bhave and Gayatri datar has a very good chemistry in real life too | तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का?

तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का?

googlenewsNext

झी मराठी वरील नवीनच सुरू झालेली 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. ही मालिका सुरु झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच झालेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील याच मालिकेने सगळ्याच जास्त पुरस्कार मिळवले आहेत. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. विक्रांत सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीत वाढली आहे.

'तुला पाहते रे' मालिकेतील ईशा निमकर ही प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे तर सुबोधने तुला पाहते रे या मालिकेद्वारे अनेक महिन्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे. तुला पाहते रे या मालिकेतील सुबोधचे दिसणे, अभिनय यावर तर प्रेक्षक फिदा झाले आहेत. या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. सुबोध आणि गायत्री हे खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सुबोध आणि गायत्री यांचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गायत्री ही या व्हिडिओमध्ये एखाद्या लहान मुलीसारखी हसताना आपल्याला दिसत असून तिला कोणीतरी सतवत असल्याने तिचे हसू थांबत नसल्याचे हा व्हिडिओ पाहाताच कळत आहे. तिला सतावणारी ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून सुबोध भावे आहे. 

सुबोध आणि गायत्रीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ अनेकांना पाहिला असून अनेक जणांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत. 

Web Title: Tula pahate re fame Subodh bhave and Gayatri datar has a very good chemistry in real life too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.