सानिया मिर्झा घटस्फोट घेणारच? शोएब मलिकसोबतचा वाद आला सोशल मीडियावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 05:22 PM2024-01-15T17:22:26+5:302024-01-15T17:25:12+5:30

सानिया मिर्झाच्या एका कृतीने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

Tennis Star Sania Mirza and Pakistani cricketer Shoaib Malik taking divorce ? sania deletes photos with husband on instagram | सानिया मिर्झा घटस्फोट घेणारच? शोएब मलिकसोबतचा वाद आला सोशल मीडियावर

सानिया मिर्झा घटस्फोट घेणारच? शोएब मलिकसोबतचा वाद आला सोशल मीडियावर

टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यात सर्वकाही आलबेल नाही अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र दोघांकडूनही अद्याप यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तोच आता सानिया मिर्झाच्या एका कृतीने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. सानियाच्या इन्स्टाग्रामवरुन शोएबसोबतचे सर्व फोटो गायब झालेले आहेत. शोएब मलिकचे एका मॉडेलसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सानिया आणि त्याच्या नात्यात कटुता आल्याचं म्हटलं जात आहे.

सानिया मिर्झा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिचे दैनंदिन अपडेट्स, डाएट, स्पोर्ट्स शेड्युल, लेकासोबतचे फोटो ती शेअर करत असते. यामध्ये नवरा आणि पाकिस्तानी अभिनेता शोएब मलिकसोबतचे फोटो अलीकडे दिसलेच नाहीत. त्यातच शोएब मलिकने मध्यंतरी पाकिस्तानी अभिनेत्री आएशा ओमरसोबत इंटिमेट फोटोशूट केलं. यानंतर शोएबचं अफेअर सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. दरम्यान शोएब पाकिस्तानमध्येच असून सानिया लेकासह भारतात आहे. त्यांच्या नात्यात कटुता आल्याची कुणकुण सगळ्यांनाच लागली. आता सानियाने सोशल मीडियावरुन शोएबसोबतचे सर्व फोटो डिलीट केल्याने चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

सानिया आणि शोएबने गेल्या वर्षी 'मिर्झा मलिक शो' हा पाकिस्तानी शो होस्ट केला होता. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबतीतील चर्चेला पूर्णविराम लागला होता. या चर्चा शोच्या प्रमोशनसाठी होत्या असंही म्हटलं गेलं. या  शोमध्ये पाकिस्तानी कपल्सना बोलावण्यात आलं होतं. मात्र नंतर शोएब मलिकने त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन 'प्राऊड हसबंड' हा उल्लेख काढला आणि पुन्हा चर्चा सुरु झाल्या. आता सानियानेही शोएबसोबतचे फोटो डिलीट केल्याने दोघंही लवकरच घटस्फोट घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 

शोएब आणि सानियाला 11 वर्षांचा इजहान हा मुलगा आहे. इजहान सानियासोबत हैदराबाद येथे राहतो. तर शोएब त्याला अधूनमधून भेटतो. सध्या शोएब आणि सानिया दोघांनीही घटस्फोट घेतलेला नसला तरी त्यांच्यात दुरावा आला आहे हे नक्की.

Web Title: Tennis Star Sania Mirza and Pakistani cricketer Shoaib Malik taking divorce ? sania deletes photos with husband on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.