तेजश्री प्रधानचे बॉलीवुडमध्ये पदापर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 14:26 IST2016-04-27T08:56:05+5:302016-04-27T14:26:05+5:30

  होणार सून मी हया घरची ही मालिका संपल्यानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या करियरला चार चॉद लागलेले दिसत आहे. एका पाठोपाठ ...

Tejashree Pradhan's footprint in Bollywood | तेजश्री प्रधानचे बॉलीवुडमध्ये पदापर्ण

तेजश्री प्रधानचे बॉलीवुडमध्ये पदापर्ण

  
होणार सून मी हया घरची ही मालिका संपल्यानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या करियरला चार चॉद लागलेले दिसत आहे. एका पाठोपाठ ही लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत आहे. नुकतेच तिने बॉलीवुडचा तगडा अभिनेता शर्मन जोशीसोबत मै और तू हे हिंदी नाटक करणार असल्याची माहिती दिली होती. आता ती, आणखी एक पाऊल पुढे टाकत बॉलीवुड चित्रपटात पदार्पण करणार असल्याचे कळते. सायोनारा-फिर मिलेंगे असे या बॉलीवुड चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये तेजश्री सोबत अतुल कुलकर्णी, शर्मन जोशी आदी कलाकार प्रमुख भुमिकेत झळकणार आहे.  नुकतेच या चित्रपटाचा मुहूर्त संपूर्ण टिमच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संगीतकार बप्पी लहरी आणि ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा उपस्थित होते. अजय वर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून मे महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात होणार आहे. तेजश्रीचा हे यश पाहता तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार. 




 

Web Title: Tejashree Pradhan's footprint in Bollywood