परमावतार श्रीकृष्णमध्ये भगवान शिवच्या अवतारात दिसणार तरूण खन्ना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:39 IST2018-02-06T08:09:05+5:302018-02-06T13:39:05+5:30

अँड टीव्हीवरील परमावतार श्रीकृष्णा या पौराणिक मालिकेतील भगवान कृष्ण आणि त्याच्या लीलांना सुरुवातीपासून प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता ...

Tarun Khanna appears in Lord Avatar in Lord Divya, Lord Krishna | परमावतार श्रीकृष्णमध्ये भगवान शिवच्या अवतारात दिसणार तरूण खन्ना

परमावतार श्रीकृष्णमध्ये भगवान शिवच्या अवतारात दिसणार तरूण खन्ना

ड टीव्हीवरील परमावतार श्रीकृष्णा या पौराणिक मालिकेतील भगवान कृष्ण आणि त्याच्या लीलांना सुरुवातीपासून प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आता जसजशी कथा पुढे सरकत आहे, तसे मालिकेमध्ये कृष्णाच्या आयुष्यात भगवान शिव यांचा प्रवेश होताना दाखविण्यात येणार आहे. यामध्ये भगवान शिवची भूमिका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता तरुण खन्ना साकारणार आहे. तरुण खन्नाने आजवर कभी आये ना जुदाई, सारा आकाश, भाभी, कसौटी जिंदगी की, किट्टू सब जानती है यांसारख्या मालिकांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत आणि विशेष म्हणजे कर्मफल दाता शनी या मालिकेत त्याने शिवाचीच भूमिका साकारली होती. तरुणने आजवर अनेक पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचे नशीब आणि कर्म खूप चांगले असल्याने त्याला अनेकवेळा पौराणिक कथांमध्ये चांगल्या भूमिका साकारायला मिळतात असे त्याला वाटते. आपल्या भूमिकविषयी तरुण सांगतो, याला नशीब म्हणा किंवा काहीही म्हणा... पण टेलिव्हिजनवर भगवान शिवची भूमिका मी साकारावी हेच माझ्या नशिबात आहे. खरे तर मला वाटते की, भगवान शिवची भूमिका जास्तीत जास्त वेळा साकारण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच आहे. आधीच्या मालिकेमध्ये जेव्हा मी रावणाची भूमिका साकारत होतो, तेव्हा मला भगवान शिवची भूमिका मिळावी अशी प्रार्थना मी करायचो. आता माझ्या प्रार्थनेला यश मिळाले आहे असे मला वाटत आहे आणि अगदी माझी प्रार्थना फळाला आली असेही वाटतेय. इतकेच नाही तर माझी बायको (स्मृती मोहन) आणि मी ही एकमेव अशी जोडी आहे ज्यांनी शिव पार्वती ही भूमिका साकारली आहे. परमावतार श्रीकृष्णामधील माझी नवी सुरुवात कधी सुरू होते आहे याची मी वाट पाहात आहे. माझ्या इतर भूमिकांप्रमाणे या मालिकेतील भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे. 
परमावतार कृष्णाच्या येणार्‍या भागात, कान्हाचे परमावतार श्रीकृष्णामध्ये परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनाच्या प्रवासात कृष्णाला त्याच्या दैवी शक्तींची जाण करून देण्यासाठी भगवान शिव पृथ्वीवर येणार आहेत.

Also Read : भगवान शिवची भूमिका साकारणे अवघड

Web Title: Tarun Khanna appears in Lord Avatar in Lord Divya, Lord Krishna