'आजी, आत्यासोबत फ्लर्ट करणं..'; शोमधील विनोदावरुन शैलेश लोढांनी ओढले कपिलचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:11 PM2023-10-03T14:11:00+5:302023-10-03T14:12:45+5:30

Shailesh lodha: 'कपिल शर्मा शो'मध्ये करण्यात येणाऱ्या विनोदावर शैलेश लोढा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-shailesh-lodha-broke-his-silence-on-criticizing-the-kapil-sharma-show | 'आजी, आत्यासोबत फ्लर्ट करणं..'; शोमधील विनोदावरुन शैलेश लोढांनी ओढले कपिलचे कान

'आजी, आत्यासोबत फ्लर्ट करणं..'; शोमधील विनोदावरुन शैलेश लोढांनी ओढले कपिलचे कान

googlenewsNext

कलाविश्वात टॅलेंटेड अभिनेत्यांच्या यादीत शैलेश लोढा यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले. शैलेश लोढा (shailesh lodha) बऱ्याचदा कलाविश्वात न पटणाऱ्या घटनांवर भाष्य करत असतात. यावेळी त्यांनी कपिल शर्माच्या द कपिल शर्मा (the kapil sharma show) या शोवर ताशेरे ओढले आहेत. या कार्यक्रमात करण्यात येणारी कॉमेडी मला पटत नाही, असं म्हणत त्यांनी  नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या सोशल मीडियावर शैलेश लोढा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात गेल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी शैलेश लोढा यांनी कपिलच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी अलिकडेच या कार्यक्रमावर सडकून टीका केली. त्यामुळे लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता त्यांनी भाष्य करत टीका करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

"कपिल आणि मी एकत्र काम केलं आहे. २०१२ मध्ये आम्ही दोघांनी सिंगापूरमध्ये एकत्र कार्यक्रम केला होता. त्यावेळी आत्या, आजी यांनी आलेल्या पाहुण्यांसोबत फ्लर्ट करणं ही आपली संस्कृती नाही हे मी सांगायचा प्रयत्न करत होतो. आणि, आजही मी माझ्या या मुद्द्यावर ठाम आहे. मला अशी कॉमेडी अजिबात आवडत नाही. मला ते पटत नाही. पण, याचा अर्थ असा नाही की मी त्याच्या शोमध्ये कधीच  जाणार नाही. आणि, मी काय करतोय हे जगाला सुद्धा ओरडून सांगणार नाही", असं शैलेश लोढा म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मी त्यांच्या शो मध्ये गेलो कवितेची ताकद काय असते ते दाखवून दिलं. त्यावेळी मी 'माँ' ही कविता ऐकल्यावर उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. एक कलाकार म्हणून कपिल हुशार आणि चांगला मित्र आहे माझा यात काही शंका नाही."

दरम्यान, शैलेश लोढा लवकरच बिग बॉस १७ मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, याविषयी अद्याप त्यांनी कोणतंही अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही.

Web Title: taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fame-shailesh-lodha-broke-his-silence-on-criticizing-the-kapil-sharma-show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.