काय सांगता! स्पृहा जोशीचा सासरा आहे प्रथमेश लघाटे, मुग्धा म्हणाली, 'म्हणजे मी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 09:18 AM2023-06-18T09:18:57+5:302023-06-18T09:19:57+5:30

मुग्धा आणि प्रथमेश स्पृहाचे सासू सासरे आहेत.

spruha joshi and prathamesh laghate are relatives mugdha vaishampayan cute reaction | काय सांगता! स्पृहा जोशीचा सासरा आहे प्रथमेश लघाटे, मुग्धा म्हणाली, 'म्हणजे मी...'

काय सांगता! स्पृहा जोशीचा सासरा आहे प्रथमेश लघाटे, मुग्धा म्हणाली, 'म्हणजे मी...'

googlenewsNext

मराठी 'सारेगमप' लिटिल चॅम्प्स गाजवणाऱ्या पंचरत्नांपैकी दोन रत्नांनी नुकतीच आनंदाची बातमी दिली. प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) दोघांनी मिळून 'आमचं ठरलंय' असं जाहीर केलं आणि मराठी प्रेक्षकांना आनंद झाला. आम्हाला शंका होतीच अशी काहीशी सर्वांची प्रतिक्रिया होती. प्रथमेश आणि मुग्धाच्या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी एका कमेंटने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधलं. ती म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशीची (Spruha Joshi) कमेंट.

प्रथमेश आणि मुग्धाने प्रेमाची कबुली देताच कमेंट्सचा वर्षाव सुरु झाला. अभिनेत्री स्पृहा जोशी कमेंट करत म्हणाली,'वाsss बुवा!!!वेलकम वहिनी!!!' स्पृहाच्या या कमेंटवर अवधूत गुप्ते म्हणाला, 'वेलकम जिजू असं का नाही?' तर स्पृहा म्हणते, 'अहो सर ते आधीच सासरे आहेत माझे.'

स्पृहाच्या या कमेंटने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. यावर मुग्धा कशी शांत बसेल. ती म्हणाली, 'हो गं..म्हणजे मला कळलं तेव्हा माझंही असंच झालं की म्हणजे मी सासू!!! नोsss'

या कमेंट सेक्शनवरुन एक खरोखरंच स्पष्ट झालं की स्पृहा आणि प्रथमेश एकमेकांचे नातेवाईक आहेत. तर आता मुग्धाही या कुटुंबाचा भाग होणार आहे. पण हे लिटिल चॅम्प्स स्पृहाचे सासू सासरे आहेत हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटतं.

स्पृहाच्या नवऱ्याचं नाव वरद लघाटे (Varad Laghate) आहे. प्रथमेश लघाटे आणि वरद लघाटे एकमेकांचे नातेवाईक आहेत. 2014 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. १३ वर्षांपासून ते एकत्र आहेत. वरदचा मराठी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. वरदने त्याची कारकीर्द एक पत्रकार म्हणून सुरू केली. तो मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होता. पण आता पत्रकारितेचे क्षेत्र सोडून वरद मार्केटिंग प्रोफेशनकडे वळला आहे.

Web Title: spruha joshi and prathamesh laghate are relatives mugdha vaishampayan cute reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.