​तारक मेहता’मधील सोनूला मिळाले ८३ टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2016 19:07 IST2016-06-06T13:37:20+5:302016-06-06T19:07:20+5:30

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सोनू अर्थात निधी भानुशाली हिने शूटींग व अभ्यास दोन्ही सांभाळण्याचे आव्हान यशस्वीपणे ...

Sonu got '83 percent marks in Tarak Mehta' | ​तारक मेहता’मधील सोनूला मिळाले ८३ टक्के गुण

​तारक मेहता’मधील सोनूला मिळाले ८३ टक्के गुण

ारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील सोनू अर्थात निधी भानुशाली हिने शूटींग व अभ्यास दोन्ही सांभाळण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले. होय, निधीने दहावीच्या परिक्षेत ८३ टक्के गुण मिळवून हे सिद्ध केले. निधीला मानसोपचार तज्ज्ञ बनायचेयं. त्यामुळे आता ती कला शाखेत प्रवेश घेणार असून मानसशास्त्रात पुढील अभ्यास करणार आहे. निधीच्या यशाने तिच्यासकट तिचे कुटुंब शिवाय ‘उल्टा चश्मा’ची संपूर्ण टीम जाम खूश आहे. निधीने मालिकेचे निर्मात असित कुमार मोदी यांना विशेष धन्यवाद दिले आहेत. असित सरांनी मला अभ्यासासाठी पूर्ण वेळ दिला, असे तिने सांगितले.

Web Title: Sonu got '83 percent marks in Tarak Mehta'