सोनाली बेफाम होऊन नाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 14:27 IST2016-09-07T08:57:10+5:302016-09-07T14:27:10+5:30

कलाकारांना एकदा सेलिब्रेटी स्टेटस प्राप्त झाले की, त्यांना सामान्य माणसांसारखे आयुष्य जगता येत नाही. ते सार्वजनिक ठिकाणी दिसले की ...

Sonali fluttered and danced | सोनाली बेफाम होऊन नाचली

सोनाली बेफाम होऊन नाचली

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">कलाकारांना एकदा सेलिब्रेटी स्टेटस प्राप्त झाले की, त्यांना सामान्य माणसांसारखे आयुष्य जगता येत नाही. ते सार्वजनिक ठिकाणी दिसले की लोक त्यांना गराडा घालतात. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन एखाद्या गणपतीच्या मिरवणुकीत नाचून दाखव असे आव्हान युवागिरी कार्यक्रमाच्या टीमने नुकतेच सोनाली कुलकर्णीला दिले होते. तिनेदेखील हे आव्हान हसत पूर्ण केले. अंधेरीतील एका मंडळाचा गणपती तिथले लोक मंडपात घेऊन जात होते. त्याचवेळी सोनाली तिच्या गाडीतून पोहोचली. कोणाला कळायच्या आत ती त्या घोळक्याचा एक भाग बनली आणि बेफाम होऊन नाचली. लोकांनी तिला ओळखल्यानंतर तेदेखील आपल्या या आवडत्या अभिनेत्रीला पाहून खूपच खूश झाले. 

Web Title: Sonali fluttered and danced