कुणीतरी येणार, येणार गं..!! ती पुन्हा येणार नव्या रुपात, 'नवा गडी नवं राज्य'मध्ये नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:11 IST2023-09-22T11:10:50+5:302023-09-22T11:11:33+5:30

Nava Gadi Nava Rajya : 'नवा गडी नवं राज्य' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Someone will come, come..!! She will come again in a new form, a new twist in 'Nava Gadi Nava Rajya' | कुणीतरी येणार, येणार गं..!! ती पुन्हा येणार नव्या रुपात, 'नवा गडी नवं राज्य'मध्ये नवा ट्विस्ट

कुणीतरी येणार, येणार गं..!! ती पुन्हा येणार नव्या रुपात, 'नवा गडी नवं राज्य'मध्ये नवा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य मालिकेनं कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील आनंदी आणि राघवच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान आता मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. येत्या २५ सप्टेंबर पासून नवा गडी नवं राज्य ही मालिका रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. तसेच या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.

नवा गडी नवं राज्य मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. लवकरच रमा एका नव्या रूपातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राघव आणि आनंदीचा संसार आता हळूहळू फुलू लागला आहे. त्यांच्या आयुष्यात आता चिमुकल्या परीचे आगमन होणार आहे. मालिकेच्या या नव्या ट्विस्टमध्ये रमा प्रेग्नेंट दाखवली आहे. आनंदी आणि राघवच्या आयुष्यात येणारी ही चिमुरडी आता रमाच्या रूपात काय धमाल घडवून आणणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. येतीये हं मी, असे म्हणत ही रमा आता लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. 


मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे रमाच्या भूमिकेत आता कोणती बालकलाकार दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Someone will come, come..!! She will come again in a new form, a new twist in 'Nava Gadi Nava Rajya'