भाभीजी घर पर है या मालिकेत या भूमिकेत दिसणार लारा दत्ता आणि अहमद खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 14:27 IST2018-04-02T08:57:32+5:302018-04-02T14:27:32+5:30

&TV वरील भाभीजी घर पर है ही मालिका आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आता या मालिकेच्या ...

Sister-in-law is at home, or Lara Dutta and Ahmed Khan will appear in this series | भाभीजी घर पर है या मालिकेत या भूमिकेत दिसणार लारा दत्ता आणि अहमद खान

भाभीजी घर पर है या मालिकेत या भूमिकेत दिसणार लारा दत्ता आणि अहमद खान

&TV
वरील भाभीजी घर पर है ही मालिका आणि या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. आता या मालिकेच्या आगामी भागात अंगुरी भाभीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाभीजी घर पर है च्या कलाकारांसह डान्स रिअॅलिटी शो हाय फिव्हर...डान्स का नया तेवरचे परीक्षक लारा दत्ता आणि अहमद खान सहभागी झालेले दिसणार आहेत. या भागासाठी नुकतेच लारा आणि अहमदने चित्रीकरण केले असून त्यांच्यासाठी चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला होता. 
भाभीजी घर पर है या मालिकेत काही दुर्दैवी कारणांमुळे आतापर्यंत अंगुरी भाभीचा (शुभांगी अत्रे) वाढदिवस आनंदात साजरा झालेला नाही. त्यामुळे वाढदिवसाची एक सरप्राईज पार्टी देऊन अंगुरीला आनंदी करायचे असे तिवारीजी (रोहितेश गौड) ठरवणार आहेत आणि त्यामुळे अंगुरी भाभीच्या वाढदिवसाच्या दिवशी हाय फिव्हरमधील परीक्षक भाभीजी घर पर है या मालिकेतील कलाकारांसह एक छानसा परफॉर्मन्स देणार आहेत. याविषयी हाय फिव्हरचे दिग्दर्शक अहमद खानला विचारले असता त्याने सांगितले, “इथे येऊन मला फारच आनंद झाला आहे. मला वाटते आहे की, भाभीजीपासून ते भैय्यांपर्यंत आणि अगदी दोन लुख्ख्या लोकांपर्यंत सगळ्याच पात्रांना मी ओळखतो. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी ही मालिका आवर्जून बघतो आणि म्हणूनच मी इथे आलो आणि पुढेही मला यायला मिळाले तर मी नक्कीच येईन.”
लारा दत्ताचे संपूर्ण कुटुंब भाभीजी घर पर है या मालिकेचे चाहते आहे. त्यामुळे तिच्याकडे त्यांच्याविषयी सांगण्यासारखे बरेच काही आहे. ती सांगते, “मालिकेचे सर्व कलाकार आणि टीमसह शूटिंग करताना मला खूपच मजा आली. ही अशी मालिका आहे जी संपूर्ण देशात पाहिली जाते आणि ही मालिका म्हणजे खरंच एक प्रकारचा ताण कमी करणारी मालिका आहे. आतापर्यंत आम्ही केवळ त्यांना पडद्यावर पाहून हसायचो, पण आज त्यांच्यासोबत हसलो आहोत. मी भाभीजी घर पर है या मालिकेचा भाग माझ्या कुटुंबासोबत बघण्यासाठी उत्सुक आहे.”

Also Read : भाभीजी घर पर है या मालिकेची टीम या कारणासाठी गेली गोव्यात

Web Title: Sister-in-law is at home, or Lara Dutta and Ahmed Khan will appear in this series