खरंच की काय...शहनाज गिल आणि पारस छाब्राचा 'मुझसे शादी करोगे' शो होणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 12:10 IST2020-03-09T12:09:54+5:302020-03-09T12:10:49+5:30

'मुझसे शादी करोगी' हा शो बंद होणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

Shehnaaz Gill & Paras Chhabra's 'Mujhse Shaadi Karoge' To Go OFF AIR Due To THIS Reason? Tjl | खरंच की काय...शहनाज गिल आणि पारस छाब्राचा 'मुझसे शादी करोगे' शो होणार बंद?

खरंच की काय...शहनाज गिल आणि पारस छाब्राचा 'मुझसे शादी करोगे' शो होणार बंद?

बिग बॉस १३ शो संपल्यानंतर यामधील कंटेस्टंट पारस छाब्रा व शहनाज गिल मुझसे शादी करोगे या शोमध्ये पहायला मिळत आहेत. या शोमध्ये पारस स्वतःसाठी वधू शोधत आहे तर शहनाज गिल स्वतःसाठी वर शोधते आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शो बंद होणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. याबाबतचा खुलासा नुकताच पारसने केला आहे.


मुझसे शादी करोगी शोच्या सुरूवातीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मात्र दोन आठवड्यानंतर त्याचा टीआरपी घसरू लागला. त्यामुळे कलर्स वाहिनी हा शो बंद करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
एका एण्टरटेन्मेंट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, मुझसे शादी करोगे लवकरच बंद होणार आहे.टीआरपी कमी असल्यामुळे हा शो बंद केला जाऊ शकतो.


मात्र यावर पारस छाब्रा म्हणाला की, नाही... हा शो बंद नाही होणार आहे. शोचा टीआरपी यायला सुरूवात झाली आहे. इतकंच नाही तर माझी आईदेखील मला म्हणाली की आता तिला प्रत्येक जण ओळखू लागलं आहे. शोमध्ये शहनाज आणि तिचा भाई शहबाज दोघेही चांगले काम करत आहेत. या शोचा कॉन्सेप्टदेखील चांगला आहे. त्यामुळे हे वृत्त खोटं आहे.


बिग बॉसच्या घरात पारस व माहिरा शर्मा यांच्यात खूप चांगलं बॉण्डिंग होते. दोघेही एकमेकांच्या क्लोज होते. मात्र दोघांनी नेहमीच एकमेकांना चांगले मित्र असल्याचे सांगितले. लवकरच पारस व माहिराचे नवीन गाणं रिलीज होणार आहे. या गाण्याचं नाव आहे बारिश. नुकतेच या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले.


बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी पारस आकांक्षा पुरीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र बिग बॉसच्या घरात आल्यानंतर पारसने सांगितले होते की. त्याचे व आकांक्षाचे ब्रेकअप झाले आहे. आकांक्षानेदेखील त्याच्या नावाचा टॅटू काढून टाकला.

तर पारसदेखील लवकरच आकांक्षाच्या नावाचा टॅटू काढून टाकणार आहे.

Web Title: Shehnaaz Gill & Paras Chhabra's 'Mujhse Shaadi Karoge' To Go OFF AIR Due To THIS Reason? Tjl