नागिन-2मध्ये शक्ती अरोरा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 12:27 IST2016-06-20T06:56:53+5:302016-06-20T12:27:29+5:30

एकता कपूरच्या नागिन मालिकेला रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळालं  या मालिकेच्या यशानंतर आता नागिन-2च्या रसिकांच्या भेटीला येणार आहे.  नागिनच्या नव्या ...

Shakti Aurora in Nagin-2? | नागिन-2मध्ये शक्ती अरोरा ?

नागिन-2मध्ये शक्ती अरोरा ?

ता कपूरच्या नागिन मालिकेला रसिकांकडून भरभरुन प्रेम मिळालं  या मालिकेच्या यशानंतर आता नागिन-2च्या रसिकांच्या भेटीला येणार आहे.  नागिनच्या नव्या सीझनमध्ये काही बदल होणार असल्याचं समजतंय. नव्या सीझनमध्ये रित्विकची भूमिका साकारणारा अर्जुन बिजलानी नसेल. त्याची जागा 'मेरी आशिकी तुमसे ही' फेम शक्ती अरोरा झळकणार असल्याचं बोललं जातंय. अभिनेत्री मौनी रायच्या प्रियकराच्या भूमिकेत शक्ती दिसेल. नागिनचा नवा सीझन ऑक्टोबरमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Shakti Aurora in Nagin-2?