सलमान थिरकला सैराटच्या गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 11:21 IST2016-06-25T05:51:37+5:302016-06-25T11:21:37+5:30

सैराट या चित्रपटाची जादू मराठी इंडस्ट्रीप्रमाणे बॉलिवुडवरही पसरली आहे. सलमान खान नुकताच सुलतान या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारेगमपच्या ...

Salman Thirakal Sairat's song | सलमान थिरकला सैराटच्या गाण्यावर

सलमान थिरकला सैराटच्या गाण्यावर

राट या चित्रपटाची जादू मराठी इंडस्ट्रीप्रमाणे बॉलिवुडवरही पसरली आहे. सलमान खान नुकताच सुलतान या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारेगमपच्या सेटवर गेला होता. या कार्यक्रमातील स्पर्धकांची गाणी ऐकून तो खूपच खूश झाला. त्याने सगळ्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. त्याचसोबत या कार्यक्रमात त्याने सैराट या चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर ताल धरला. या नृत्यात त्याला त्याची सहकलाकार अनुष्का शर्मानेही साथ दिली. सलमान आणि अनुष्का यांचा हा डान्स पाहून स्पर्धक, मेन्टर, परीक्षकांसोबतच तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही सैराट या गाण्यावर नृत्य करून आनंद लुटला.

Web Title: Salman Thirakal Sairat's song