अलकाला साकारायची अंगुरी भाभीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 20:29 IST2016-11-27T20:29:01+5:302016-11-27T20:29:01+5:30

प्लेबॅक सिंगर अलका याज्ञिक यांना आता अभिनय क्षेत्रात नशीब आजमावयाचे आहे. आश्चर्य वाटले ना! हो, हे खरे आहे. अलका ...

The role of Anguli Bhabhi played by Alkaala | अलकाला साकारायची अंगुरी भाभीची भूमिका

अलकाला साकारायची अंगुरी भाभीची भूमिका

लेबॅक सिंगर अलका याज्ञिक यांना आता अभिनय क्षेत्रात नशीब आजमावयाचे आहे. आश्चर्य वाटले ना! हो, हे खरे आहे. अलका यांना ‘भाबीजी घर पर है’ मालिकेतील अंगुरी भाभीची भूमिका साकारायची आहे. कारण तिच्या मते ही भूमिका सिंपल आणि स्वीट आहे. 



अलकाला जेव्हा अभिनयाबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने, जर संधी मिळाली तर अंगुरी भाभीची भूमिका करायला आवडेल, असे पट्कन उत्तर दिले. ती म्हणाली, मी नियमितपणे भाभीजी घर पर है ही कॉमेडी मालिका बघत असते. मीच नव्हे तर माझे संपूर्ण कुटुंब या मालिकेचे दिवाणे आहे. मात्र भाभीजीचा ‘सही पकडे है’ या संवादाने आम्हा सगळ्यांना मोहिनी घातली आहे. आम्ही सर्वच अंगुरी भाभीचे जबरदस्त फॅन्स आहोत. त्यामुळे जर अभिनयाची संधी मिळाली तर अंगुरी भाभीची भूमिका नक्कीच साकारेल, अशी इच्छा अलका यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: The role of Anguli Bhabhi played by Alkaala