'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नव्या रिलला मिळतेय पसंती, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 12:07 IST2023-01-11T12:07:19+5:302023-01-11T12:07:58+5:30

Deepika Chikhalia : अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नवीन व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

'Ramayana' fame actress Deepika Chikhalia's new reel is getting likes, the video is viral | 'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नव्या रिलला मिळतेय पसंती, व्हिडीओ व्हायरल

'रामायण' फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या नव्या रिलला मिळतेय पसंती, व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रामायण'(Ramayan)तील सीतेने त्यांच्या नवीन लूकने नेटिझन्सना आश्चर्यचकित केले आहे. रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia) यांनी कॅमेऱ्यासमोर कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. दीपिका यांचा नवीन अवतार व्हिडिओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. कॅमेऱ्यासमोर कपडे बदलल्यामुळे त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

रामायण शोमध्ये सीतेची भूमिका करणारी दीपिका चिखलिया लेटेस्ट व्हिडीओच्या सुरुवातीला पांढऱ्या टी-शर्ट आणि निळ्या पायजमामध्ये दिसत आहेत. तसेच अभिनेत्रीचा लूकही अगदी साधा आहे. तेव्हाच त्यांचा लूक बदलतो आणि त्यानंतर दीपिका पांढर्‍या टी-शर्टमध्ये प्रिंटेड शर्ट आणि पायजमा ड्रेसमध्ये दिसत आहेत. दीपिका यांची ग्लॅम स्टाईल लोकांना वेड लावत आहे.

रामायणमध्ये 'सीता'ची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया इंस्टाग्राम सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दीपिका चिखलिया यांना त्यांच्या लेटेस्ट व्हिडिओमुळे इंटरनेटवर खूप ट्रोल केले जात आहे. काही लोक अजूनही दीपिका चिखलिया यांना रामायणातील सीता मानतात, त्यामुळे सोशल मीडियाच्या जमान्यात त्यांना खूप ट्रोल व्हावे लागते. एका यूजरने कमेंट केली की, तुम्ही रामायणातील चांगले धडे देणार्‍या क्लिपही टाकता, तर दुसऱ्याने गंमतीत लिहिले की, तुम्ही रामजींच्या वाढदिवसाला जात आहात का?

Web Title: 'Ramayana' fame actress Deepika Chikhalia's new reel is getting likes, the video is viral