प्राजक्ताचं ५ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, तर महेश मांजरेकरांच्या लेकीची स्टार प्रवाहच्या मालिकेतून मालिकाविश्वात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:41 IST2026-04-29T11:39:51+5:302026-04-29T11:41:20+5:30

तब्बल ५ वर्षांनी प्राजक्ता गायकवाड स्टार प्रवाहवरील मालिकेतून कमबॅक करत आहे. 'पाठराखीण' या नव्या मालिकेत प्राजक्ता दिसणार आहे. महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेदेखील या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. 

prajakta gaikwad comeback after 5 years mahesh manjarekar daughter gauri ingawale debut in star pravah patharakhin serial | प्राजक्ताचं ५ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, तर महेश मांजरेकरांच्या लेकीची स्टार प्रवाहच्या मालिकेतून मालिकाविश्वात एन्ट्री

प्राजक्ताचं ५ वर्षांनी टीव्हीवर कमबॅक, तर महेश मांजरेकरांच्या लेकीची स्टार प्रवाहच्या मालिकेतून मालिकाविश्वात एन्ट्री

प्राजक्ता गायकवाड हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली होती. पण, मध्ये काही वर्ष प्राजक्ता टीव्हीवर दिसली नव्हती. आता तब्बल ५ वर्षांनी प्राजक्ता गायकवाड स्टार प्रवाहवरील मालिकेतून कमबॅक करत आहे. 'पाठराखीण' या नव्या मालिकेत प्राजक्ता दिसणार आहे. महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेदेखील या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण करत आहे. 

पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करताना नेमकी काय भावना आहे हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, "पुन्हा प्रेक्षकांना भेटण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. खूप दिवसांपासून मालिका कधी करणार यासाठी विचारणा होत होती. पाठराखीण मालिकेच्या निमित्ताने ही सुवर्णसंधी चालून आली. स्टार प्रवाह सारखी लोकप्रिय वाहिनी आणि बांदेकर कुटुंबियांची सोहम प्रोडक्शनसारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. मध्यंतरीच्या काळात बरेच मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट केले. अनेक जाहिराती केल्या. टीव्ही हे माझं अत्यंत आवडतं माध्यम आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका आहे. प्राजक्ता कुलकर्णी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केला. तिच्यासाठी मामा-मामी म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाई. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी अंतिम आहे. वैद्य कुटुंबावर तिचं अपार प्रेम आहे आणि या घराचं भलं व्हावं यासाठी ती काहीही करु शकते. प्रेक्षकांनी या भूमिकेलाही प्रेम द्यावं ही अपेक्षा आहे". 

महेश मांजरेकरांची लेक अभिनेत्री गौरी इंगवलेदेखील मालिका विश्वात एण्ट्री घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. गौरी म्हणाली, "खूप दिवसांपासून मालिका करण्याची इच्छा होती. पाठराखीण मालिकेमुळे माझी इछापूर्ती होतेय असं म्हण्टलं तर वावगं ठरणार नाही. टीव्ही माध्यमात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. या जगाशी नव्याने ओळख करुन घेतेय. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता. त्यामुळे खूप उत्सुक आहे. माझ्या कुटुंबियांनीदेखील खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मला खात्री आहे ही मालिका आणि या मालिकेतील सगळी पात्रं प्रेक्षकांना नक्की आवडतील".  

‘पाठराखीण' मालिकेत प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची गोष्ट पाहायला मिळणार आहे. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. सोहम आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. 

Web Title : 5 साल बाद प्राजक्ता की टीवी पर वापसी; मांजरेकर की बेटी का डेब्यू

Web Summary : 'पाठराखीण' से पांच साल बाद प्राजक्ता गायकवाड़ की टीवी पर वापसी, गौरी इंगवले का भी डेब्यू। श्रृंखला जीवन की चुनौतियों के बीच बहनhood का पता लगाती है।

Web Title : Prajakta's TV Comeback After 5 Years; Manjrekar's Daughter Debuts.

Web Summary : Prajakta Gaikwad returns to TV after five years in 'Pathrakhin,' also marking Gauri Ingawale's debut. The series explores sisterhood amidst life's challenges.