OMG चक्क होणा-या पतीसाठी पूजा बॅनर्जीने 'या' सीनला दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 16:11 IST2016-11-29T16:10:24+5:302016-11-29T16:11:22+5:30

सध्या सिनेमा असो किंवा टीव्ही मालिकांमध्ये सर्रास बेड सीन्स दाखवले जाताता. इंटिमेट सीन्सचा भडीमार असलेले सिनेमांचा हाच ट्रेंड आता ...

Pooja Banerjee refuses to give 'this' scene to OMG widow husband? | OMG चक्क होणा-या पतीसाठी पूजा बॅनर्जीने 'या' सीनला दिला नकार?

OMG चक्क होणा-या पतीसाठी पूजा बॅनर्जीने 'या' सीनला दिला नकार?

्या सिनेमा असो किंवा टीव्ही मालिकांमध्ये सर्रास बेड सीन्स दाखवले जाताता. इंटिमेट सीन्सचा भडीमार असलेले सिनेमांचा हाच ट्रेंड आता टीव्ही मालिकांमध्येही पाहायला मिळतोय. मालिकेच्या किंवा सिनेमाची कथेची गरज असल्यामुळे असे सीन्स देण्यास कलाकारांनाही काही संकोच वाटत नाही.असाच काहीसा सीन नागार्जुन एक योध्दा मालिकेसाठी पूजा बॅनर्जीला द्यायचा होता. मात्र तिने हा सीन देण्यास नकार दिलाय. मालिकेच्या एका भागात सुहाग रातचे सीन शूट करण्यात येणार होते. त्यात  पर्ल व्ही. पुरीबरोबर पूजाने किसींग सीन्स करण्यास नाकारले. त्यामुळे ‘नागार्जुन- एक योध्दा’ मालिकेच्या निर्मात्यांपुढे एक अनपेक्षित पेच पडला. कारण हा प्रसंग शूट करण्यात पूजाला काहीसा संकोच वाटत होता आणि म्हणून तिने निर्मात्यांना त्यात बदल करण्याची विनंती केली.



पूजाने या सीनला नकार दिला त्याला एक खास कारणही होते. नुकताच राष्ट्रीय स्तरावरील स्विमींग चॅम्पियन असलेला संदीप सेजवळ याच्याशी काही महिन्यांपूर्वीच पूजा बॅनर्जीचा साखरपुडा झाला आहे. पूजा म्हणाली, “मी अभिनेत्री असल्यामुळे मला असे सीन्स देण्यास काही हरकत नाही,मात्र संदीप या क्षेत्रातील नसल्याने त्याला अशा प्रसंगांची गरज काय असते, हे समजू शकणार नाही. या गोष्टी कदाचित संदीप आणि सासू-सास-यांना आवडणार नाहीत त्यांना दुखावण्याची माझीही इच्छा नाही. मला जेव्हा पटकथा मिळाली, तेव्हा त्यात किसींग सीन्स आणि ‘पहिल्या रात्री’चा प्रसंग सांगण्यात आला होता. पण मला तसा प्रसंग साकारताना संकोच वाटत होता. निर्मात्यांना विनंती केल्यानंतर याप्रसंगांमध्ये फेरफार करण्यात आले आहे.”

Web Title: Pooja Banerjee refuses to give 'this' scene to OMG widow husband?