ऑनस्क्रीनच नाहीतर ऑफस्क्रीनही आहे दोघांमध्ये कोल्डवॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 16:59 IST2017-02-13T11:09:32+5:302017-02-13T16:59:35+5:30

देबिना बॅनर्जी डबल रोल करत असलेली पौराणिक मालिका संतोषी माता मालिकेत झळकतेय.मात्र तिचे मालिकेतील रतन राजपुत या अभिनेत्रीसह बिसल्याचे ...

Onscreen is either offline or off-screen, both are coldwares | ऑनस्क्रीनच नाहीतर ऑफस्क्रीनही आहे दोघांमध्ये कोल्डवॉर

ऑनस्क्रीनच नाहीतर ऑफस्क्रीनही आहे दोघांमध्ये कोल्डवॉर

बिना बॅनर्जी डबल रोल करत असलेली पौराणिक मालिका संतोषी माता मालिकेत झळकतेय.मात्र तिचे मालिकेतील रतन राजपुत या अभिनेत्रीसह बिसल्याचे कळतंय. मालिकेच्या शूटिंगवेळी कधीच या दोघींनी एकमेकींशी नीट संवादही साधलेला नाही. पडद्यावर एकमेकींच्या विरूद्ध भूमिका साकारणा-या या दोन्ही अभिनेत्रींमध्ये पडद्यामागेही पटत नसल्याचे माहिती मिळतेय.या मालिकेत दोघींच्याही भूमिकांना समान दर्जा दिला गेला आहे. मात्र तरीही दोघींना समान दर्जा दिला जात नाही असे वाटत असते. दोघींनाही दिलेल्या भूमिका एकमेकांशी वरचढ असल्याचे दोघींना वाटते.त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याचे एकीचे मत नसून दोघींनाही त्यांच्याबरोबर भेदभाव केला जात असल्याचे वाटते.रतनला वाटते की देबीनाला डायलॉग जास्त दिले जातात.तिलाच जास्तवेळ झळकवले जाते.तर देबिनाच्या तुलनेत रतनला कमी डयलॉग दिले जात असल्यामुळे ती जास्त ऑनस्क्रीन दिसत नसल्याचे रतन राजपूतने म्हटले आहे.मात्र या दोघींमध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरचे मालिकेच्या शूटिंगला अडथळा निर्माण होत नसल्यामुळे मालिकेची टीमही या दोघींमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. जो पर्यंत आमच्या मालिकेचे शूटिंग उत्तमप्रकारे होत आहे.तोपर्यंत आम्ही दोघींच्याही जीवनात ढवळाढवळ करणार नसल्याचे मालिकेच्या टीमने सांगितले.पडद्यावर एकमेका विरोधात भूमिका साकारा-या या अभिनेत्री वास्तविक जीवनातही एकमेकींच्या विरोधातच असतात. 


'संतोषी मा' या पौराणिक मालिकेत देबीना बॅनर्जी डबल रोलमध्ये झळकत आहे. पहिल्यांदाचा ती अशाप्रकारे डबल रोल साकारत असून पौलिमिनी आणि तृष्णा असे दोन्ही कॅरेक्टर देबिना साकारत आहे. देवलोकातील मत्सराची देवता पौलोमिनी संतोषीला(रतनसिंह राजपुतला) त्रास देण्यासाठी बरीच कट कारस्थानं रचतात.पृथ्वी तलावर तृष्णाच्या रूपात संतोषी आणि धारियासाठी अडचणी निर्माण करण्यासाठी  ती पृथ्वी तलावर अवतरते.अशा प्रकारे दोघींच्या भूमिका मालिकेत मांडण्यात आल्या आहेत.यापूर्वी देबीनाने रामायनमध्ये सीताची भूमिका साकारली होती. तर तिचा रिअल लाईफ पती गुरमित चौधरीने रामची भूमिका साकारली होती. राम सीताच्या भूमिकेत देबीना आणि गुरमित या जोडीला रसिकांची खूप पसंती मिळाली होती. 

Web Title: Onscreen is either offline or off-screen, both are coldwares