​आता ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 16:10 IST2016-10-27T11:33:49+5:302016-10-27T16:10:17+5:30

दुर्वा ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या सुरुवातीला एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाची कथा प्रेक्षकांना ...

Now the audience will take the series to leave | ​आता ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

​आता ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

र्वा ही मालिका गेली कित्येक वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या सुरुवातीला एका प्रतिष्ठित राजकीय कुटुंबाची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. त्या कुटुंबातील वाद-विवाद, राजकीय चढाओढ प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेत अण्णा पाटील यांची व्यक्तिरेखा विनय आपटे यांनी साकारली होती. पण त्यांच्या निधनानंतर ही भूमिका शरद पोंक्षे यांनी तितक्याच ताकदीने पेलली. या मालिकेतील दुर्वा आणि केशवची म्हणजेच हृता दुरगुले आणि हर्षद आतकरी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी काही वर्षांचा लीप घेतला. लीपनंतर हृता आणि हर्षद वगळता इतर सगळे नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले. लीपच्या आधी या मालिकेत प्रेक्षकांना दुर्वा पाटील आणि केशव साने यांची कथा पाहायला मिळाली होती. पण आता प्रेक्षकांना दुर्वाची मुलगी दुर्वाची कथा पाहायला मिळत आहे. दुर्वाची मुलगीदेखील तिच्यासारखीच आहे. समाजात होँणाऱ्या वाईट गोष्टीवर ती आवाज उठवते. 
दुर्वा या एकाच मालिकेत हृता आणि हर्षद यांना वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली होती. त्यांचा लूकही दोन्ही भूमिकांसाठी पूर्णपणे वेगळा होता. पण ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय.
दुर्वा ही मालिका लवकरच संपणार असून आम्ही दोघे राजाराणी ही नवी मालिका दुर्वाची जागा घेणार असल्याचे कळतेय. दुर्वा या मालिकेचे आता काहीच भाग शिल्लक असून लवकरच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले जाणार आहे.  


 

Web Title: Now the audience will take the series to leave