2 MAD च्या मंचावर सई ताम्हणकरने केला हा नवा संकल्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 18:13 IST2017-03-23T12:43:46+5:302017-03-23T18:13:46+5:30

2 MAD या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील अमृता खानविलकर, संजय जाधव आणि उमेश जाधव यांची ...

A new resolution by Sai Tamhankar on 2 MAD stage! | 2 MAD च्या मंचावर सई ताम्हणकरने केला हा नवा संकल्प!

2 MAD च्या मंचावर सई ताम्हणकरने केला हा नवा संकल्प!

2 MA
D या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील अमृता खानविलकर, संजय जाधव आणि उमेश जाधव यांची तिकडी तर प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या तिन्ही परीक्षकांनी टॉप टेन स्पर्धकांची निवड केली असून आता या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्यासाठी चढाओढ चांगलीच रंगली आहे. या मंचावर आतापर्यंत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, अहमद खान, कंगणा रणौट यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली असून त्यांनी स्पर्धकांना अधिक चांगल्याप्रकारे नृत्य करण्यास प्रोत्साहित केले आहे. 
या कार्यक्रमात गुढीपाडव्यानिमित्त सई ताम्हाणकरने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचा मॅडनेस, उत्साह आणि त्यांचे नृत्याबद्दलचे प्रेम लक्षात घेऊन सई या मंचावर आली होती. तिने स्पर्धकांशी दिलखुलास संवाद साधला आणि सगळ्यांची मने जिंकली.  
या भागात पलकने लल्लाटी भंडार तर मितालीने सुंदर नाट्यसंगीतावर नृत्य सादर केले. श्रीदळवीने विंचू चावला आणि तुषारने डोकं फिरलंया हा गाण्यांवर तुफान नृत्य सादर करून सईचे मन जिंकले. सईने सोनल विचारेचे विशेष कौतुक केले आणि ती सईची लाडकी स्पर्धक आहे असे देखील तिला सांगितले. हे ऐकून सोनलला खूपच आनंद झाला.  
तुषारने सईसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सईने त्याची ही इच्छा लागलीच पूर्ण केली. आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर नृत्य करायला मिळाले म्हणून तुषारला खूप आनंद झाला. 2 MAD च्या मंचावर सईने आपल्या नृत्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आणि तिचा नवीन वर्षाचा संकल्प प्रेक्षकांना सांगितला. ती सांगते, “नवीन वर्षात मी आत्मविश्वासाने डान्स करायला शिकणार आहे.”

Web Title: A new resolution by Sai Tamhankar on 2 MAD stage!