स्पृहाने केला नवीन हॅशटॅगचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 02:20 IST2016-02-24T09:15:10+5:302016-02-24T02:20:13+5:30

  मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली असली तरी तिचे कविताप्रेम हे तितकेच रसिंकासमोर आले आहे. ...

New Hashtag Resolution by Spani | स्पृहाने केला नवीन हॅशटॅगचा संकल्प

स्पृहाने केला नवीन हॅशटॅगचा संकल्प

  मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली असली तरी तिचे कविताप्रेम हे तितकेच रसिंकासमोर आले आहे. तिच्या कवितादेखील अभिनयाप्रमाणेच रसिकांना भावल्या आहेत. याच कविताप्रेमी स्पृहा जोशीने मराठी भाषा दिनानिमित्त एक नवीन हॅशटॅगसंकल्प केला आहे. यामध्ये तिने कुसुमाग्रजंचं पृथ्वीचे प्रेमगीत यातील एक कविता हॅशटॅग या संकल्पाद्वारे शुट करून सोशलमिडीयावर टाकले आहे. पण हा हॅशटॅग संकल्प नक्की काय या विचारात पडला असेल? तर ऐका, स्पृहा म्हणते, हॅशटॅग संकल्प म्हणजे,२७ फ्रेबुवारीला मराठी भाषानिमित्त कवी कुसुमाग्रजांचं आपल्याला आवडलेलं एक वाक्य मोबाईलमध्ये शुट करून सगळया सोशलवेबसाइटवर ते टाकायचं आणि त्याबरोबर # टॅग मराठी वाक्य हा हॅशटॅग आठवणीने जोडायचा. माझ्याप्रमाणेच मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी हाच संकल्प रसिकांनीदेखील करावा असे आवाहनदेखील तिने केले आहे.
 

TAGमराठीवाक्य

एक नवीन संकल्पना..या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिना निमित्त आपण कुसुमाग्रजांचं आपल्याला आवडलेलं वाक्य मोबाईल वर शूट करून सगळ्या सोशल मिडीआवर टाकायचे आणि त्या बरोबर #TAGमराठीवाक्य हा hashtag जोडायचा..तुम्ही पण करा या 27 फेब्रुवारीला..सलाम कुसुमाग्रज!!उदाहरणार्थ...

Posted by Spruha Shirish Joshi on Tuesday, February 23, 2016

Web Title: New Hashtag Resolution by Spani