मायराच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:38 PM2022-03-15T13:38:54+5:302022-03-15T13:39:55+5:30

Myra vaikul: मायराच्या आईने श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे.

new family member arrives at the house of mazi tuzi reshimgath fame pari | मायराच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; फोटो होतायेत व्हायरल

मायराच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन; फोटो होतायेत व्हायरल

googlenewsNext

सध्याच्या काळात अनेक चित्रपट, मालिकांमध्ये कलाकारांसोबतच काही बालकलाकारही पाहायला मिळतात. यात काही बालकलाकार असे असतात जे त्यांच्या निरागसपणामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात आणि कायमस्वरुपी त्यांच्या स्मरणात राहतात. त्यातलीच एक बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. माझी तुझी रेशीमगाठ  या मालिकेत परी ही भूमिका साकारणारी मायरा सध्या लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते. सध्या मायरा एका खास कारणामुळे चर्चेत येत आहे.

आपल्या निरागसतेमुळे संपूर्ण प्रेक्षकवर्गाला आपलंसं करणारी मायरा कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असते. यात मायरा अनेकदा तिच्या सेटवरचे किंवा कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. परंतु, यावेळी परी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

मायराच्या आईने श्वेता वायकुळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' नंतर परी झळकणार नव्या भूमिकेत; व्हिडीओ होतोय व्हायरल

मायराच्या फॅमिलीत एका नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक कारचं आगमन झालं आहे. मायराच्या आई-बाबांनी TATA Nexon EV इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या कारसोबतचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या कारसोबत परीने सुंदर पोझही दिली आहे.

दरम्यान, "1 June 1960 हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल", असं कॅप्शन श्वेता वायकुळ यांनी या फोटोला दिलं आहे. सध्या मायरासोबतच तिच्या आईचीदेखील लोकप्रियता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: new family member arrives at the house of mazi tuzi reshimgath fame pari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.