कधी वेटर तर कधी कंडक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 14:17 IST2016-09-07T08:47:21+5:302016-09-07T14:17:21+5:30

कलश...एक विश्वास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा कृप सुरी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. कृप आज छोट्या पडद्यावरील ...

Never a waiter or a conductor | कधी वेटर तर कधी कंडक्टर

कधी वेटर तर कधी कंडक्टर

श...एक विश्वास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा कृप सुरी हा प्रेक्षकांचा प्रचंड लाडका बनला आहे. कृप आज छोट्या पडद्यावरील एका मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असला तरी त्याच्यासाठा इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. कृपची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असल्याने दहावी झाल्यापासून तो शिकवण्या घेऊन आपल्या शिक्षणाचा खर्च उचलत होता. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्याने मॅकडॉन्ल्डमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तसेच तो लग्नांमध्ये नाचून पैसे मिळवत असे. त्याला त्यावेळी एका लग्नात नाचण्याचे 500 रुपये मिळत असत. त्याने त्याही परिस्थितीत हार न मानता आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण झाल्यानंतर त्याने बस कंडक्टर म्हणून नोकरी केली. पण त्याला लहानपणापासूनच अभिनयाचे अाकर्षण असल्याने तो अभिनयाकडे वळला. त्याने अभिनयात प्रशिक्षण घेतले नसले तरी आज तो एक चांगला अभिनेता असल्याचे त्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे. 

Web Title: Never a waiter or a conductor