"नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच गर्भपात झाला", मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली- "त्या वेळेला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:49 IST2025-06-12T12:46:43+5:302025-06-12T12:49:00+5:30

"नाटकाच्या चालू प्रयोगात मिसकॅरेज झालं...", 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला 'तो' वाईट प्रसंग 

marathi television actress tu hi re majha mitwa fame surabhi bhave spoke about miscarriage incident says | "नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच गर्भपात झाला", मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली- "त्या वेळेला..."

"नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच गर्भपात झाला", मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली- "त्या वेळेला..."

Surabhi Bhave: चित्रपट असो किंवा मालिका अभिनयाच्या या प्रवासात कलाकारांना अनेकदा चांगल्या वाईट प्रसंगाना समोरं जावं लागतं. बऱ्याचदा हे कलाकार त्यांचे अनुभव वेगवेगळ्या माध्यमातून सांगत असतात. मराठी मालिकाविश्वातील एका अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला आहे. ही अभिनेत्री म्हणजे सुरभी भावे. सध्या सुरभी भावे 'तू ही रे माझा मितवा'या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेत वल्लरी नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभी भावे सध्या चर्चेत आली आहे. सुरभीने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचा कलाक्षेत्रातील अनुभव आणि बऱ्याच गोष्टींवर विचार मांडले आहेत.

नुकतीच सुरभी भावेने 'मराठी मनोरंजन विश्व' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या करिअरबद्दल भाष्य करताना अनेक वाईट अनुभवही शेअर केले. तेव्हा ती म्हणाली, "कामाबद्दल मी काही किस्से सांगेन की जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला अनेक लोकांनी घाबरवलं की ते म्हणायचे, आता काय पाच वर्षांचा गॅप... मी त्यांना म्हटलं पाच वर्ष नाही मी पाच महिने देखील गप्प बसणार नाही. कारण मला घरात बसण्याची सवय नाही. ज्या दिवशी मी ग्रॅज्यूएशनचा शेवटचा पेपर दिला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी काम करतेय. त्यावेळी आधी जॉब करत होते त्यानंतर या क्षेत्रात आले. तेव्हा माझी आणि नवऱ्यामध्ये अशी चर्चा झाली होती, की मी काम सुरुच ठेवणार, मला ब्रेक घ्यायचा नव्हता. तो कॉर्पोरेट क्षेत्रात असल्यामुळे त्याला वर्क फ्रॉम होमची सोय होती. माझ्याबाबतीत तसं नव्हतं. त्यामुळे त्याने घरी थांबण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात माझ्या कुटुंबियांची खूप पाठिंबा मिळाला."

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "दुसरी गोष्ट कामाला प्राधन्य म्हणजे, एकदा तिच्या अंगात १०३ ताप होता आणि मला शूटला बोलावलं. त्यावेळी एक आई म्हणून मी स्वत: ला खूप कोसलं. त्यावेळी मला पहिल्यांदा असं वाटलं की एक आई म्हणून मी कुठेतरी कमी पडले. पण, तेव्हा सुद्धा माझ्या नवऱ्याने साथ दिली."

नाटकाच्या चालू प्रयोगात गर्भपात झाला...

त्या प्रसंगाबद्दल सांगताना अभिनेत्रीने म्हटलं, "सान्वी नंतर मी पुन्हा प्रेग्नंट राहिले होते. तेव्हा माझा नाटकाचा प्रयोग सुरु होता आणि चालू प्रयोगात माझा  गर्भपात झाला. पण त्याही वेळेला मी कुठेही थांबले नाही. ना त्याचा कुठे बाहु केला. त्यावेळी माझं असं म्हणणं होतं की, जे झालं ते झालं, पण प्रयोग थांबवून काही उपयोग नव्हता. तेव्हा देखील माझ्या नाटकातल्या सगळ्या सहकलाकारांनी खूप सपोर्ट केला. 'सागरा प्राण तळमळला' नावाचं ते नाटक होतं." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. 

वर्कफ्रंट

अभिनेत्री सुरभी भावेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 'राणी मी होणार', '36 गुणी जोडी' व 'सख्या रे' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. 

Web Title: marathi television actress tu hi re majha mitwa fame surabhi bhave spoke about miscarriage incident says