"या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण...", अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:33 IST2026-04-15T13:31:01+5:302026-04-15T13:33:11+5:30
"या क्षेत्रातला मुलगा नको होता...",'अशी' जमली अपूर्वा-तनुजची जोडी? नवऱ्याबद्दल म्हणाली-"माझ्या आयुष्यात …"

"या इंडस्ट्रीतला मुलगा नको होता, कारण...", अपूर्वा नेमळेकरंच 'असं' जमलं लग्न; नवरा 'या' क्षेत्रात करतो काम
Apurva Nemlakar: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे अपूर्वा नेमळेकर.'रात्रीस खेळ चाले', 'आभास हा',' प्रेमाची गोष्ट' अशा लोकप्रिय मालिकांमधून अपूर्वाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.दरम्यान,अलिकडेच अपूर्वाने १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेचं औचित्य साधत तनुज गोवळकरबरोबर लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र,अपूर्वा आणि तनुजचं लग्न कसं जमलं? या दोघांची पहिली भेट कुठे झाली? याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा नेमळेकरने तिच्या लग्नाबद्दल सांगितलं. अपूर्वाचा पती तनुज गोवलकर हा एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो. अपू्र्वा म्हणाली," मी आजवर बऱ्याच गोष्टींबद्दल मॅनिफेस्ट खूप केलं आहे. याच्याबाबतीतही तसंच होतं. मी एका गोष्टीवर ठाम होते. ती म्हणजे मला माझ्या क्षेत्रातला मुलगा नको होता. गेली १५ वर्ष खूप काम केल्यानं आता आयुष्यात शांतता असावी अशी माझी अपेक्षा आहे, म्हणूनच या इंडस्ट्रीतला कुणी नको हवा होता.मग मला मॅट्रिमोनी साईटशिवाय काही पर्याय नव्हता. त्यावर मी रीतसर नाव नोंदवलं, त्यावरून मी अनेकांना भेटलेसुद्धा.दरवेळेला त्यांना भेटल्यानंतर मला जाणवायचं की, लग्न करणं खरंच गरजेचं आहे का? मी अक्षरश: कंटाळले होते. त्यानंतर मी ठरवलं की, माझ्या आयुष्यात ज्याला यायचं आहे तो येईल."
पुढे मुलाखतीत अपू्र्वा म्हणाली, "अखेर मी कंटाळून मी नंतर मॅट्रिमोनी साईट अक्षरश: गेम खेळल्यासारखं पहायला लागले. माझी भाची अधिका नावाची भाची आहे, तिने मला एकेदिवशी मला विचारलं, ‘तू काय करतेयस?’ तर मी तिला म्हटलं की, ‘हा एक गेम आहे, इथे नवरा मिळतो.’ त्यावर ती म्हणाली, 'मी शोधते तुझ्यासाठी नवरा.’
असं म्हणत तिने सुरु केलं. तेव्हा एक मुलगा डॉक्टर होता, त्याला बघून अधिका म्हणाली, ‘हा डॉक्टर आहे, नको नको, हा तुला वेळ नाही देऊ शकणार. हा पेशंटकडे लक्ष देईल की, तुला वेळ देईल. हा नको' नंतर मग एक मुलगा होता. त्याचा गिटार वाजवतानाचा फोटो होता. तो फोटो बघून ती म्हणाली, ‘हा नको, हा बाजापेटी वाजवत बसेल, तर तू वैतागून जाशील.' ती जे काही बोलत होती, त्याला मी मस्करीतच घेत होते."
आमच्या एकत्र येण्यामागे...
"त्यानंतर तिसरा फोटो होता तो तनुजचा होता. त्यात त्यानं ब्लेझर घातलेला फोटो होता.याचे ते फोटो बघून अधिका म्हणाली, ‘बघ ब्लेझऱ घातलाय. हा मुलगा जेटलमन वाटतोय.’ तिनं तेव्हा लगेच तनुजला रिक्वेस्ट पाठवली होती.मग मी तनुजचे फोटो वगैरे पाहिले. म्हटलं बघू रिप्लाय येतोय का? पुढे तनुजकडूनही रिप्लाय आला आणि आम्ही बोलायला लागलो. अधिका पुढच्या दिवशी पुण्याला गेली. त्याच्याच पुढच्या दिवशी आम्ही भेटलो. त्यामुळे आमच्या एकत्र येण्यामागे माझी भाची महत्त्वाची व्यक्ती आहे."
घटस्फोटितच मुलगा असावा ही अपेक्षा…
जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षांबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली,"इतक्या लोकांसोबत बोललीये मी, त्यामुळे मला भीती वाटायची. त्यामुळे एका पॉईंटला मी सगळं थांबवलं. सगळ्यात पहिले मराठी मुलगा असावा आणि तो डिव्होर्सी असावा या माझ्या अपेक्षा होत्या. मला खूप जणांनी विचारलं लग्नासाठी पण मी त्यांना नकार दिला. कारण, ज्या व्यक्तीने त्या दुःखाची चवच नाही घेतली, त्याला माझं दुःख नाही समजणार. तनुज छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझा विचार करतो." असं मत देखील अभिनेत्रीने व्यक्त केलं.