Dreamy Proposal! मराठी गायिकेला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; थेट केनियात जाऊन घातली लग्नाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:30 IST2026-03-19T13:29:00+5:302026-03-19T13:30:19+5:30
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायिका लवकरच लग्न करणार आहे. या गायिकेला बॉयफ्रेंडने अत्यंत खास अंदाजात प्रपोज केलं आहे.

Dreamy Proposal! मराठी गायिकेला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; थेट केनियात जाऊन घातली लग्नाची मागणी
सध्या लगीनघाईचा काळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात अनेक कलाकारांची लग्न झाली. अशातच मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध गायिका लवकरच लग्न करणार आहे. या गायिकेला बॉयफ्रेंडने अत्यंत खास अंदाजात प्रपोज केलं आहे. इंग्रजीत ज्याला Dreamy Proposal म्हणतात अशा स्वप्नवत अंदाजात गायिकेच्या बॉयफ्रेंडने गायिकेला प्रपोज केलंय. ही गायिका आहे शरयू दाते.
'आनंदी गोपाळ' सिनेमातील गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गायिका शरयू दातेने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी शेअर केली. शरयूच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे विभास वाटवे. विभासने गुडघ्यावर बसून निसर्गरम्य वातावरणात शरयूला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे केनियातील मसाई मारा या प्रसिद्ध ठिकाणी शरयूच्या बॉयफ्रेंडने तिला प्रपोज केलंय. शरयूला अचानक हे सरप्राईज मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं होतं. शरयूने बॉयफ्रेंडने दिलेली अंगठी दाखवून सर्वांना ही आनंदाची बातमी दिली.
शरयू दाते सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. शरयूने ही आनंदाची बातमी देताच चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंय. शरयू दातेने 'सूर नवा ध्यास नवा' या शोमधून तिच्या गायनाची चुणुक दाखवली. शरयूच्या गोड आवाजाचं परीक्षकांनीही कौतुक केलं. शरयूने नंतर 'आनंदी गोपाळ' सारख्या मराठी सिनेमांमधून तिच्या गायनाची जादू सर्वांना दाखवली. आता शरयू लवकरच लग्न करुन तिच्या आयुष्याची नवी सुरुवात करेल.