नवविवाहित मुग्धापेक्षा सासूबाईंचीच सोशल मीडियावर चर्चा; स्पृहा-मुग्धाचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:25 IST2024-01-16T19:19:47+5:302024-01-16T19:25:19+5:30

Spruha joshi: मुग्धा आणि स्पृहा या दोघींमध्ये छान मैत्री असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.

marathi actress spruha joshi and mugdha vaishampayan photo viral on social media | नवविवाहित मुग्धापेक्षा सासूबाईंचीच सोशल मीडियावर चर्चा; स्पृहा-मुग्धाचा फोटो होतोय व्हायरल

नवविवाहित मुग्धापेक्षा सासूबाईंचीच सोशल मीडियावर चर्चा; स्पृहा-मुग्धाचा फोटो होतोय व्हायरल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन ( mugdha vishampayan) आणि प्रथमेश लघाटे (prathamesh laghate). सारेगमप लिटिल चॅम्प्स या गाजलेल्या कार्यक्रमातून ही जोडी घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे या जोडीने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे या जोडीची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे या जोडीचं अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी (spruha joshi) हिच्यासोबत खास नात आहे. नुकताच स्पृहाने प्रथमेश आणि मुग्धासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्पृहा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्या नवनवीन प्रोजेक्ट, कविता वाचनाचे कार्यक्रम वा गाण्याच्या कार्यक्रमाचे अपडेट देत असते. यात अलिकडेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. यात तिच्यासोबत तिने प्रथमेश आणि मुग्धासोबतचाही फोटो शेअर केला.

स्पृहाने हा फोटो शेअर केल्यानंतर  अनेकांनी या सासूसुनेच्या जोडीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर या फोटोमधून दोघींचं बॉण्डिंगही दिसून येतं.

दरम्यान, स्पृहा आणि मुग्धा या दोघी नात्याने एकमेकींच्या सासू-सुना आहेत. मुग्धा आणि प्रथमेश यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला  होता. यामध्येच स्पृहाने केलेल्या कमेंटमधून ती मुग्धाची सासू असल्याचा उलगडा झाला.

Web Title: marathi actress spruha joshi and mugdha vaishampayan photo viral on social media