किम शर्मा आणि लिएंडर पेसनंतर झालं आणखी एका कपलचं ब्रेकअप, रागाच्या भरात अभिनेत्रीने डिलीट केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:54 IST2023-04-05T15:34:13+5:302023-04-05T15:54:31+5:30

बिग बॉस 13 चे एक्स कंटेस्टंट पारस छाबरा आणि माहिरा शर्मा यांचे ब्रेकअप झाले आहे. दोघे 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या ब्रेकअपची बातमी एकून चाहते हैराण झालेत.

Mahira sharma paras chhabra breakup actress deleted all pictures from account know truth | किम शर्मा आणि लिएंडर पेसनंतर झालं आणखी एका कपलचं ब्रेकअप, रागाच्या भरात अभिनेत्रीने डिलीट केले फोटो

किम शर्मा आणि लिएंडर पेसनंतर झालं आणखी एका कपलचं ब्रेकअप, रागाच्या भरात अभिनेत्रीने डिलीट केले फोटो

बिग बॉसचा 13वा सीझन हा कार्यक्रम पाहणारे क्वचितच विसरले असतील. सीझन 13 मध्ये चाहत्यांना जबरदस्त मनोरंजनाचा मसाला मिळाला. शोमध्ये सिडनाजची जोडी असो किंवा माहिरा शर्मा (Mahira Sharma) आणि पारस छाब्रा  (Paras Chabra) यांच्या प्रेमाचे किस्से असो, स्पर्धकांनी लोकांचे भरपूर मनोरंजन केले. शो संपल्यानंतर एकत्र दिसणार्‍या जोडप्यांपैकी एक म्हणजे माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा. पण दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत.


माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा हे एक टीव्ही कपल आहे, ज्यांनी कधीही त्यांच्या नात्याला कोणताही टॅग दिला नाही. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांची निराशा केली आहे.

माहिरा शर्माने डिलीट केले पारसचे फोटो
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिरा शर्मा आणि पारस छाब्रा आता एकत्र नाहीत आणि दोघांचे ब्रेकअप झाले आहे. माहिराने पारससोबत शेअर केलेले फोटो तिच्या अकाउंटवरून डिलीट केल्यामुळे चाहत्यांनाही अंदाज लावला आहे. माहिरा शर्मा आणि पारस काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये राहत होते. काम संपताच माहिरा आणि पारस मुंबईत परतले आहेत. मात्र, परत आल्यानंतर सर्व काही पूर्वीसारखे नसल्याचं बोलले जात आहे.

माहिरा शर्मा आणि पारस छाबरा यांच्या ब्रेकअपची बातमी एकून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झालेत.हे कसे घडले हे कोणालाच समजत नाही. हे दोघे जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते. जरी दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणायचे. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांच्या नात्याचा अंदाज आलाच होता. 
  


 

Web Title: Mahira sharma paras chhabra breakup actress deleted all pictures from account know truth