‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतनं खरेदी केली नवी कोरी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:15 PM2023-05-20T18:15:10+5:302023-05-20T18:21:27+5:30

ओंकार राऊतनं शेअर केलेल्या या नव्या कारच्या फोटोवर त्याचे चाहते कमेंट करत आहेत.

Maharashtrachi hasyajatra fame onkar raut buy brand new car on sachin tendulkar birthday | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतनं खरेदी केली नवी कोरी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार राऊतनं खरेदी केली नवी कोरी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हास्यांची मेजवानी मिळत असते. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडतात. या कार्यक्रमातील विनोदवीर घराघरात लोकप्रिय झाले आहेत. अभिनेता ओंकार राऊतलाही महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमुळे लोकप्रियता मिळाली. अभिनयाची उत्तम जाण व विनोदाचं अचूक टायमिंग साधत ओंकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

 अभिनयाबरोबरच ओंकार सोशल मीडियावर सक्रीय असतो. ओंकारनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्यानं गाडी घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. ओंकारनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ओंकार राऊतने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. नव्या गाडीबरोबरचे फोटो ओंकारने शेअर केले आहेत. फोटोबरोबरच नव्या गाडीसाठी ओंकारने खास पोस्ट लिहिली आहे. ओंकारच्या या गाडीचं सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाशी खास कनेक्शन आहे. “२४/४/२०२३ला नवी baleno घरी आली,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“अक्षयतृतीयेला गाडी घेता आली नाही पण योगायोगाने सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला ती घरी आली! (साडे तीन मुहूर्तांपैकी नसला तरी हा ही देवाचाच दिवस!) सचिनच्या average एवढ, तिचं mileage असावं! सचिन च्या runs एवढे, तिचे kilometers व्हावे! सचिनच्या straight drive एवढी smooth तिची drive असावी!,” असंही पुढे ओंकारने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ओंकार राऊतनं शेअर केलेल्या या नव्या कारच्या फोटोवर त्याचे चाहते कमेंट करतआहेत. तसेच प्रथमेश परब, प्रसाद ओक, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी फोटोवर कमेंट केल्या आहेत. 
 

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame onkar raut buy brand new car on sachin tendulkar birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.