​लारा दत्ता हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या कार्यक्रमात झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:17 IST2018-02-06T10:47:06+5:302018-02-06T16:17:06+5:30

२००० साली विश्वसुंदरीचा मुकूट भारतात आणणार्‍या या तरुण बुद्धिमान महिलेने गेल्या काही वर्षांत वैविध्यपूर्ण भूमिका निभावून बॉलिवूमध्ये आपला ठसा ...

Lara Dutta Hi Fever - In the role of examiner as a new show of dance | ​लारा दत्ता हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या कार्यक्रमात झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत

​लारा दत्ता हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या कार्यक्रमात झळकणार परीक्षकाच्या भूमिकेत

०० साली विश्वसुंदरीचा मुकूट भारतात आणणार्‍या या तरुण बुद्धिमान महिलेने गेल्या काही वर्षांत वैविध्यपूर्ण भूमिका निभावून बॉलिवूमध्ये आपला ठसा उमटवला आहे. तिच्या अभिनयाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करतात. लाराने गेल्या काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध टेनिसपट्टू महेश भुपतीशी लग्न केले. त्या दोघांना एक  मुलगी देखील आहे. लारा सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ हा तिच्या कुटुंबियांना देते. लारा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंवर आवर्जून प्रतिक्रिया देतात. लाराच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ती आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे. हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये लारा परीक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. 
हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये लाराचा सहभाग निश्चित झालेला आहे. देशभरातल्या नृत्याची आवड असलेल्या लोकांसाठी हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमात अनेक जण जोड्यांमध्ये आपले नृत्य कौशल्य सादर करणार आहेत. हा शो देशातील सर्व वयोगटातील नर्तक जोडप्यांच्या नातेसंबंधांवर आधारलेला आहे. माय-लेकी, मुलगा-पिता, नवरा-बायको, विद्यार्थी-शिक्षक आदी जोड्यांचा यात समावेश होणार आहे. या कार्यक्रमाविषयी लारा दत्ता सांगते, जेव्हा हाय फिव्हर हा शो माझ्याकडे आला, तेव्हा या शोच्या संकल्पनेशी मी स्वतःला खूप रिलेट केले. या शोमध्ये सहभागी होणार्‍या जोड्यांच्या नात्यांतील सौंदर्य आणि त्यांचे नृत्य कौशल्य पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे.
लारा स्वतः नातेसंबंधांबाबत अतिशय संवेदनशील असल्याने हाय फिव्हर – डान्स का नया तेवर या डान्स रिअॅलिटी शो साठी ती परफेक्ट परीक्षक ठरेल, असे या कार्यक्रमाच्या टीमचे म्हणणे होते. त्यामुळेच त्यांनी या कार्यक्रमासाठी लाराला विचारले आणि लाराने देखील या कार्यक्रमासाठी लगेचच होकार दिला. या कार्यक्रमात लारासोबत परीक्षकाच्या खुर्चीवर आणखी कोण बसेल, याची देखील चांगलीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. 

Web Title: Lara Dutta Hi Fever - In the role of examiner as a new show of dance