उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:44 IST2023-10-03T13:44:26+5:302023-10-03T13:44:52+5:30
उर्फी जावेदचे मिस्ट्री मॅनबरोबर हिंदू पद्धतीने पूजा करतानाचे फोटो व्हायरल, अभिनेत्रीने साखरपुडा केल्याची चर्चा

उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? मिस्ट्री मॅनबरोबरचे फोटो झाले व्हायरल
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिचे चित्रविचित्र कपड्यांमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने उर्फी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. कधी वायर गुंडाळून तर कधी टॉयलेट पेपरचा ड्रेस घालून उर्फी लक्ष वेधून घेणारी उर्फी मात्र सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये उर्फी मिस्ट्री मॅनबरोबर हिंदू पद्धतीने पूजा करताना दिसत आहे. त्यांच्यासमोर हवन केल्याचंही दिसत आहे. या फोटोंमध्ये उर्फीने निळ्या रंगाचा ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेत पारंपरिक हिंदू पद्धतीने पूजा करत आहे. एका इन्स्टाग्राम पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोंवरुन उर्फीने साखरपुडा उरकल्याचं म्हटलं जात आहे.
या फोटोंमुळे उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीने खरंच साखरपुडा केला का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. उर्फीबरोबर फोटोत दिसणारा हा मिस्ट्री मॅन नेमका कोण आहे, असा प्रश्नही चाहते विचारत आहेत. याबाबत अद्याप उर्फीने मात्र कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही.