हेमांगी कवी करणार स्कूल चलेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 09:20 IST2016-04-28T03:50:56+5:302016-04-28T09:20:56+5:30

बॉलीवुडला तेरे नाम, क्यो की, मिलेंगे मिलेंगे, हमारा दिल आपके पास है असे एक से एक अनेक सुपरहिट चित्रपट ...

Hemangi poets will go to school | हेमांगी कवी करणार स्कूल चलेंगा

हेमांगी कवी करणार स्कूल चलेंगा

लीवुडला तेरे नाम, क्यो की, मिलेंगे मिलेंगे, हमारा दिल आपके पास है असे एक से एक अनेक सुपरहिट चित्रपट देणारे तगडे दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्यासोबत आपली मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी बॉलीवुडमध्ये झळकण्यास तयार झाली आहे. स्कूल चलेंगा या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये सतीश कौशिक स्वत: असल्याची माहिती हेमांगी कवी हिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. हेमांगी म्हणाली, लहान मुलांचे चित्रपट नेहमीच येतात. हा एक वेगळा चित्रपट असणार आहे. यामध्ये शिक्षण हा महत्वाचा भाग असून तो एकदम गंभीररीत्या न मांडता प्रेक्षकांना समजेल इतक्या सहज व सोप्या पद्धतीने मांडण्यांचा प्रयत्न केला आहे. तसेच या चित्रपटात मी एका लहान मुलांच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Hemangi poets will go to school