गोल्डन रोज अवॉर्डमध्ये सेलिब्रेटींनी मारली बाजी? या खास वैशिष्ट्यांमुळे पहिल्यांदाच झळकलेला गोल्डन रोज अवॉर्ड ठरला हटके?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 12:29 IST2016-12-19T12:11:29+5:302016-12-19T12:29:36+5:30

वर्षअखेरीस कलाकरांचा गौरव करण्यासाठी अनेक पुरस्कार सोहळे रंगतात. आता एका मागे एक कलाकारांचा गौरव करण्यासाठी अनेक रंगारंग शो छोट्या ...

Golden Rose Awards celebrated by celebrities? Due to these special features, the first ever seen Golden Rose Award? | गोल्डन रोज अवॉर्डमध्ये सेलिब्रेटींनी मारली बाजी? या खास वैशिष्ट्यांमुळे पहिल्यांदाच झळकलेला गोल्डन रोज अवॉर्ड ठरला हटके?

गोल्डन रोज अवॉर्डमध्ये सेलिब्रेटींनी मारली बाजी? या खास वैशिष्ट्यांमुळे पहिल्यांदाच झळकलेला गोल्डन रोज अवॉर्ड ठरला हटके?


/>वर्षअखेरीस कलाकरांचा गौरव करण्यासाठी अनेक पुरस्कार सोहळे रंगतात. आता एका मागे एक कलाकारांचा गौरव करण्यासाठी अनेक रंगारंग शो छोट्या पडद्यावर झळकतील. यात पहिल्यांदाचा छोट्या पडद्यावर झळकला गोल्डन रोज अवॉर्ड. बीटाऊनच्या सेलिब्रेटींच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात पार पडला हा दिमाखदार सोहळा. मात्र यावेळी काही वेगळ्या गोष्टींनी रसिकांवर छाप पाडली. बादशाह शाहरूख खान, अर्जुन कपूर आणि करण जोहरने खास आपल्या स्टाइमध्ये होस्ट केले. 



हे अवॉर्डस देऊन सेलिब्रेटींचा गौरव

बॉलिवूडमधील या ग्लॅमरस सेलिब्रेटींचा वेगवेगळ्या कॅटगरीत अवॉर्ड देऊन सम्मान करण्यात आला.'द लिजंड अवॉर्ड' देऊन शर्मिला टागोर यांचा विशेष गोरव करण्यात आला.करिना कपूर ग्लॅमर दिवा ऑफ द इअरची मानकरी ठरली तर 'आयकॉनिक लुक ऑफ द इअर'साठी दीपिका पादुकोण, 'मोस्ट लव्हेबल कॅरेक्टर ऑफ द इअर'साठी आलिया भट्ट, 'इंटरनॅशनल फेस ऑफ द इअर'साठी प्रियांका चोप्रा, 'मोस्ट डिझायरेबल दिवा ऑफ द इअर'चा मान कॅटरिना कैफला मिळाला तर 'राइझिंग स्टार ऑफ द इअर' ठरली तापसी पन्नु. गोल्डन रोज अवॉर्ड अशा प्रकारे कौतुकाचा वर्षाव करणारा ठरला. तर अभिनेत्री पुजा हेगडे बेस्ट डेब्यु 2016 चा अवॉर्ड  देण्यात आला. 




या शोचे ठरले हे खास आकर्षण

या अवॉर्ड शोमध्ये अनेक हटके परफॉर्मन्स सादर करण्यात आले.शोचा होस्ट शाहरुखने दीपिका पदुकोणसोबत डान्स केला तर कतरिनाने काला चश्मा..वर ठुमके लावले. अर्जुन कपूर आणि करण जोहरच्या ब्रोमान्सने प्रेक्षकांना खळखळून हसवले.तर सुशांत सिंग राजपुतनेही आपल्या रंगारंग परफॉर्मन्सने सा-यांनाच फुल ऑन एंटरन्टेंमेंट केले. जॅकलिननेही आपले खास  परफॉर्मन्स देऊन उपस्थितांची मनं जिकंली.तर यांत सा-यांची आकर्षण ठरली ती बेबो करिना कपूर तिच्या बेबी बंपसोबत पोज देताना दिसली.



अवॉर्ड्स फंक्शनमध्ये पोहोचले हे बॉलिवूड स्टार्स

'लक्स गोल्डन रोज अवार्ड्स'मध्ये मलायका अरोरा खानने गोल्डन गाऊन कॅरी केला होता, तर दीपिका पदुकोण ग्रे कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. हृतिक रोशन, शाहिद कपूर, आदिती राव हैदरी,तापसी पन्नू, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, माधुरी दीक्षित, अर्जुन कपूर या स्टार्सनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याला चारचाँद लावले.

Web Title: Golden Rose Awards celebrated by celebrities? Due to these special features, the first ever seen Golden Rose Award?