'गणपती मोरया 'मध्ये गणेशाची सत्वपरीक्षा? एकाच वेळी दोन मातांची ओढ? कसा मार्ग काढेल गणू बाप्पा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 16:32 IST2016-12-02T16:32:08+5:302016-12-02T16:32:08+5:30

श्री गणेश, पार्वतीनंदन, गौरीपुत्र, उमासुत या नावाने गणेशला ओळखले जाते. तो गणपती त्याच्या श्रेष्ठ आणि पराकोटीच्या मातृभक्तीमुळेच प्रथमपुज्याचा मानकरी ...

Ganapati Morcha 'Ganesh Morcha' exam? Two mothers at the same time? How to remove Ganu Bappa? | 'गणपती मोरया 'मध्ये गणेशाची सत्वपरीक्षा? एकाच वेळी दोन मातांची ओढ? कसा मार्ग काढेल गणू बाप्पा ?

'गणपती मोरया 'मध्ये गणेशाची सत्वपरीक्षा? एकाच वेळी दोन मातांची ओढ? कसा मार्ग काढेल गणू बाप्पा ?

री गणेश, पार्वतीनंदन, गौरीपुत्र, उमासुत या नावाने गणेशला ओळखले जाते. तो गणपती त्याच्या श्रेष्ठ आणि पराकोटीच्या मातृभक्तीमुळेच प्रथमपुज्याचा मानकरी ठरला. युगायुगांसाठी अवघ्या त्रेलोक्याचं लाडक दैवत ठरला.असा हा गणपती जेंव्हा भूतलावरील एका मातेला तिचा पुत्र होऊन त्याच्या लीलांचंसुख अनुभवयाची संधी देतो, तेंव्हाच तो युक्तीने आपल्या कैलासावरील पार्वतीमातेलाही पुत्रवियोगाच दु:ख जाणवणार नाही अशी व्यवस्था करतो. मात्र आईवेड्या गणेशासाठी हा निर्णय घेणं जरी धर्माला अनुसरून योग्य वाटलेलं असलं तरी त्याच्या हळव्या मनात कुठेतरी आपली आई आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणावर तरी जास्त प्रेम करू लागलीय कि काय हि भावनाही मनात रुजते. तर दुसरीकडे भूलोकावरील माता जिच्या पोटी त्याने जन्म घेतलाय, त्या आदितीलाही आपल्या वागण्याने दु:ख होऊ नये अशी त्याची इच्छा आहे, एकाच वेळी दोन मातांच्या मायेची ओढ वाटण आणि त्यातून मनाची कुतरओढ होणं यातून विनायक कसा मार्ग काढेल हे येणा-या भागात उलगडणार आहे. 

Web Title: Ganapati Morcha 'Ganesh Morcha' exam? Two mothers at the same time? How to remove Ganu Bappa?