​मंदिरा बेदीने किस केले प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर शहीन अब्बासला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 13:55 IST2017-03-15T08:25:05+5:302017-03-15T13:55:05+5:30

मंदिरा बेदी नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मंदिराचे अनेक बिकनीतील फोटो इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. ती इन्स्टाग्रामवर ...

The famous jewelery designer, Shahin Abbas, who did the temple, did a kiss | ​मंदिरा बेदीने किस केले प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर शहीन अब्बासला

​मंदिरा बेदीने किस केले प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर शहीन अब्बासला

दिरा बेदी नेहमीच इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. मंदिराचे अनेक बिकनीतील फोटो इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात. ती इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असल्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटला तिचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. तिने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर टाकला आहे. या फोटोची सध्या चांगली चर्चा होत आहे. पण त्याचसोबत या फोटोवर तिला खूप सारे कमेंट्स आले असून काहीजणांनी तर तिला चांगलेच धारेवर धरले आहे.
प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर शहीन अब्बास ही मंदिराची खूपच जवळची मैत्रीण आहे. शहीन आणि मंदिराची मैत्री ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. शहीन ही प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि सूत्रसंचालक रोशन अब्बासची पत्नी आहे. शहीनचा नुकताच वाढदिवस झाला होता. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंदिराने तिचा आणि शहीनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत मंदिरा शहीनच्या ओठावर किस करताना दिसत आहे. शहीनच्या 40व्या वाढदिवशी तिने तिला याप्रकारे विश केले आहे. यासोबत तिने शहीन ही मला माझ्या कुटुंबीयातील सदस्य असून तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असे लिहिले आहे. या तिच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपली ही संस्कृती नाही असे म्हणत मंदिराला काही जणांनी फटकारले आहे तर काहींनी ती लेस्बियन आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
मंदिराने हा फोटो पोस्ट केल्यापासून सहा हजारच्यावर लोकांनी या फोटोला लाइक केले आहे तर दोनशेहून अधिक लोकांनी यावर कमेंट केले आहे. या फोटोमुळे मंदिरा सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.  



Web Title: The famous jewelery designer, Shahin Abbas, who did the temple, did a kiss