'सगळे मला छोटा हत्ती...' डिलीव्हरीनंतर देबिनाने कसं केलं वजन कमी, सांगितला पूर्ण प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 15:00 IST2023-07-13T14:56:35+5:302023-07-13T15:00:41+5:30

पहिल्या डिलीव्हरीनंतर एका काही महिन्यातच तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याची माहिती शेअर केली होती.

debina bonnerjee says everyone called her mini elephant ignored everyone and focused on workout | 'सगळे मला छोटा हत्ती...' डिलीव्हरीनंतर देबिनाने कसं केलं वजन कमी, सांगितला पूर्ण प्रवास

'सगळे मला छोटा हत्ती...' डिलीव्हरीनंतर देबिनाने कसं केलं वजन कमी, सांगितला पूर्ण प्रवास

टीव्ही शो 'रामायण'मध्ये सीतेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) राघरात पोहोचली. तिने नुकताच दोन मुलींना जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या ती त्यांच्या संगोपनात व्यस्त आहे. विशेष म्हणजे पहिल्या डिलीव्हरीनंतर एका काही महिन्यातच तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याची माहिती शेअर केली. यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. त्यावेळी तिचं वजन खूप वाढलं होतं. अक्षरश: 'छोटा हत्ती' म्हणूनही तिला हिणवलं गेलं. 

देबिना बॅनर्जी सध्या युट्यूबवर व्लॉग बनवते. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी ती व्लॉगच्या माध्यमातून शेअर करते.  नुकतंच तिने एका व्हिडिओत सांगितलं की ती कधीच वर्कआऊट मिस करत नाही. आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलताना ती म्हणाली, 'सगळे मला छोटा हत्ती, मिनी हत्ती म्हणायचे.  जेव्हा मी हे सगळं ऐकायचे तेव्हा मी हाच विचार करायचे की मेहनत करणं नाही थांबवायचं. जेव्हा लोक टोमणे मारतात तेव्हा ते सकारात्मकरित्या घेतलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे.'

वजन कमी करण्याच्या एकंदर प्रवासाविषयी बोलताना देबिना म्हणाली,'ऊन असो किंवा पाऊस वर्कआऊट करणं सोडायचं नाही. चरबी कमी करायची असेल तर मेहनत करावी लागेल. लोकं ट्रोल करतच राहतील शिव्या देत राहतील पण मी कामात लक्ष देणार हे मी ठरवलं होतं. अशा कमेंट्समुळे मला आणखी मेहनत करायची प्रेरणा मिळते. मला तर परत बिकीनी फ्लॉंट करायची आहे. मी याआधी मालदीव्ह्जमध्ये केलं होतं. यासाठी मी वर्कआऊट करत राहणार.'

मी आणि माझे पती गुरमित चौधरी रोज सकाळी ४ वाजता उठतो. आम्ही वर्कआऊट करण्यासाठी २० किमी दूर ड्राईव्ह करुन जातो. मग वर्कआऊट करतो. यात खूप मेहनत करावी लागते. मेहनत करणार नाही तर यश मिळणार नाही, असंही ती म्हणाली.

Web Title: debina bonnerjee says everyone called her mini elephant ignored everyone and focused on workout