'अनेकदा ते माझ्यासोबत..'; लग्नानंतर पहिल्यांदाच भारती सिंगने केला सासू-सासऱ्यांच्या वागणुकीविषयी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:49 IST2022-01-20T12:47:19+5:302022-01-20T12:49:02+5:30

Bharti singh:आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी भारती खऱ्या आयुष्यातही प्रचंड सुस्वभावी आणि मनमिळावू आहे. अनेकदा याचा प्रत्ययही प्रेक्षकांनी घेतला आहे.

comedian bharti singh reveals bonding with mother in law and husband family | 'अनेकदा ते माझ्यासोबत..'; लग्नानंतर पहिल्यांदाच भारती सिंगने केला सासू-सासऱ्यांच्या वागणुकीविषयी खुलासा

'अनेकदा ते माझ्यासोबत..'; लग्नानंतर पहिल्यांदाच भारती सिंगने केला सासू-सासऱ्यांच्या वागणुकीविषयी खुलासा

 लाफ्टर क्वीन भारती सिंग (bjarti singh) हे नाव आजच्या कोणत्याच प्रेक्षकासाठी नवीन नाही. विनोदाच्या दुनियेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारतीने तिची हक्काची जागा निर्माण केली आहे. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी भारती खऱ्या आयुष्यातही प्रचंड सुस्वभावी आणि मनमिळावू आहे. अनेकदा याचा प्रत्ययही प्रेक्षकांनी घेतला आहे. भारती लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच लग्नाच्या चार वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीने तिच्या सासू-सासऱ्यांविषयी तिचं मत मांडलं आहे. घरात तिला सासू-सासऱ्यांकडून कशी वागणूक मिळते यावर तिने भाष्य केलं आहे.

अलिकडेच भारतीने सुरभी-समृद्धी म्हणजे चिंकी-मिकीं यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या लग्नाविषयी व सासरच्या मंडळींविषयी भाष्य केलं आहे."तू पंजाबी कुटुंबात लहानाची मोठी झालीयेस आणि हर्ष गुजराती आहे. तर लग्नानंतर कसं अॅडजेस्ट केलं? घरात कधी तू तू मैं मैं झालं का?"  यावर भारतीने मजेशीर उत्तर दिलं. 

"खरंतर ड्राय स्टेट असलेले लोक आता ड्रिंकिंग स्टेट झाले आहेत. आता अनेकदा माझे सासरेसुद्धा आमच्यासोबत बसून चीअर्स करतात. आणि, तू तू मैं मैं होण्याचा प्रश्नचं नाही सासू-सासरे दोघंही आता माझ्याच बाजूने असतात", असं उत्तर भारतीने दिलं.

दरम्यान, भारती आज लाफ्टर क्वीन या नावाने सगळीकडे ओळखली जाते. भारती लवकरच आई होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गूडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. 

Web Title: comedian bharti singh reveals bonding with mother in law and husband family