Bigg Boss OTT 3: लव कटारियाचा बांधून ठेवलेला हात, तोच मागून गेला साप; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:40 IST2024-07-09T14:39:22+5:302024-07-09T14:40:12+5:30

बिग बॉसमध्ये एका टास्कवेळी लव कटारियाला शिक्षा दिली आहे.

Bigg Boss OTT 3 Luv Kataria s tied hands and snake goes from behind Video viral | Bigg Boss OTT 3: लव कटारियाचा बांधून ठेवलेला हात, तोच मागून गेला साप; Video व्हायरल

Bigg Boss OTT 3: लव कटारियाचा बांधून ठेवलेला हात, तोच मागून गेला साप; Video व्हायरल

Bigg Boss OTT 3 मधील स्पर्धक लव कटारियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याचा जीव धोक्यात असल्याचं यात दिसून आलं कारण लव कटारिया (Luv Kataria) गार्डन एरियामध्ये बसलेला असताना त्याच्या मागून चक्क साप जाताना व्हिडिओत दिसून येत आहे. तसंच एका टास्कमुळे लवचा हातबी बांधलेला आहे. या व्हिडिओनंतर लव कटारियाच्या बाजूने अनेक फॉलोअर्स आणि इतर लोक उभे राहिले आहेत. 

बिग बॉसमध्ये एका टास्कवेळी लव कटारियाला शिक्षा दिली आहे. हात बांधून त्याला गार्डनमध्येच झोपावं लागलं. १२ तासांपासून तो असाच बसलेला आहे. त्याला किती त्रास होतोय हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येतंय. इतकंच नाही तर व्हिडिओत आणखी एक घटना कैद झाली आहे. गार्डन एरियात हात बांधून बसलेल्या लवच्या मागून चक्क साप जाताना दिसतोय. नुसता व्हिडिओ पाहूनच अनेकांच्या अंगावर काटा आला असेल. चाहत्यांनी त्याच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे.

हा व्हिडिओ पाहून चाहते आक्रमक झालेत. स्पर्धकांच्या सुरक्षेसोबत खेळणाऱ्या मेकर्सवर सर्वच भडकलेत. साप लवकेशच्या थोडं जरी जवळ असता तरी लवकेश हात बांधलेले असल्याने काहीच करु शकला नसता. तर दुसरीकडे जिओ सिनेमा मेंबरने मात्र व्हिडिओ मॉर्फ करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र मेकर्सने नंतर गार्डन एरिया रिकामा केल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन तिथे साप होता हे स्पष्ट झालं.

Web Title: Bigg Boss OTT 3 Luv Kataria s tied hands and snake goes from behind Video viral