फायनलपर्यंत पोहोचली पण ट्रॉफी मिळाली नाही; 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतल्यावर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:55 IST2026-04-20T10:55:27+5:302026-04-20T10:55:53+5:30
दिपालीला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. १०० दिवसांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर दिपालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

फायनलपर्यंत पोहोचली पण ट्रॉफी मिळाली नाही; 'बिग बॉस'च्या घरातून एक्झिट घेतल्यावर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली...
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले रविवारी(१९ एप्रिल) पार पडला. तन्वी कोलते यंदाच्या पर्वाची विजेती ठरली. 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तन्वीने नावावर केली. काटा गँगमधील तन्वी कोलते, राकेश बापट आणि दिपाली सय्यद ते तीन सदस्य टॉप ५मध्ये पोहोचले होते. मात्र दिपालीला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. १०० दिवसांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर दिपालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
दिपाली सय्यदने पोस्टमधून प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, "टॉप ५’ पर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी केवळ एक खेळ नव्हता. तर ते माझ्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न होतं. Thank you ‘बिग बॉस’ मला ही संधी दिल्याबद्दल आणि स्वतःला सिद्ध करण्याची ताकद दिल्याबद्दल! माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुमच्या अफाट प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच मी इथवर पोहोचू शकले. तुम्ही दिलेला प्रत्येक वोट आणि दाखवलेला विश्वास हीच माझी खरी ट्रॉफी आहे. माझ्या पाठीशी खंबीरपणे सर्व उभे राहिले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. प्रवास संपला असला तरी या आठवणी कायम काळजात राहतील. हे प्रेम असंच कायम राहू द्या".
तन्वी कोलते आणि राकेश बापट हे 'बिग बॉस मराठी ६'चे टॉप २ फायनलिस्ट होते. विशाल कोटियनला तिसऱ्या, अनुश्री मानेला चौथ्या आणि दिपाली सय्यदला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विनर ठरली. तर राकेश बापट उपविजेता ठरला. तन्वीला ट्रॉफी आणि १५ लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.