Bigg Boss 15: प्रतिक सहजपालच्या कृत्यावर सलमान खान भडकला; “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर...”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 11:25 AM2021-10-09T11:25:00+5:302021-10-09T11:30:36+5:30

Salman Khan Angry on Pratik Sehajpal in Bigg Boss 15: विशेषत: विधी पंड्याचा उल्लेख करत सलमान खानने प्रतिक सहजपालवर राग व्यक्त केला.

Bigg Boss 15: Salman Khan angry on Pratik Sehajpal for the Vidhi Pandya incident | Bigg Boss 15: प्रतिक सहजपालच्या कृत्यावर सलमान खान भडकला; “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर...”

Bigg Boss 15: प्रतिक सहजपालच्या कृत्यावर सलमान खान भडकला; “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर...”

googlenewsNext

मुंबई - बिग बॉस(Bigg Boss) १५ हिंदी शो च्या पहिल्याच आठवड्याच्या सुरुवातीला अभिनेता सलमान खानचा(Salman Khan) राग अनावर झाला. स्पर्धक प्रतिक सहजपाल याच्यावर सलमान खान चांगलाच संतापला. वीकेंडचा वार प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सलमान खानने प्रतिक सहजपालला(Pratik Sehajpal) खडेबोल सुनावले. जे तो कायम लक्षात ठेवेल.

प्रतिकचं संतापजनक कृत्य तरीही माफी मागितली नाही

विशेषत: विधी पंड्याचा उल्लेख करत सलमान खानने प्रतिक सहजपालवर राग व्यक्त केला. बिग बॉसच्या प्रेक्षकांना माहिती असेल की मागच्या एपिसोडमध्ये प्रतिकने टास्क जिंकण्याच्या नादात मर्यादा ओलांडली होती. विधी पांड्या बाथरुममध्ये अंघोळ करत होती आणि प्रतिक बाथरुमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनी प्रतिकला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. मात्र प्रतिकनं कुणाचंही ऐकलं नाही. इतकचं काय तर केलेल्या कृत्यावर प्रतिकनं माफीही मागितली नाही.

सलमान खाननं घेतला प्रतिकचा क्लास

आगामी एपिसोडमध्ये प्रतिक सहजपालला त्याने केलेल्या कृत्याबद्दल सलमान खानकडून प्रचंड ओरडा ऐकावा लागला. प्रोमोमध्ये सलमान खान संतापलेल्या अवस्थेत म्हणतोय की, माझी आई किंवा बहिणी बाथरुममध्ये अंघोळ करत असती तरी मी असं केले असतं जर कुणी असं म्हणत असेल तर प्रतिक तु मुर्ख आहेस. वाह. याचा अर्थ खेळ हा आई आणि बहिणीपेक्षा मोठा आहे. विधीने मनात आणलं असतं तर तुझी लायकी काढली असती. “जर माझी बहिण असती तर मी....” बिग बॉस स्पर्धक प्रतिक सहजपालने बिग बॉसच्या घरातील मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचार करण्यावरुनही सलमानने फटकारलं आहे.

काय घडला प्रकार?

Bigg Boss च्या एपिसोडमध्ये मॅप पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांना एक टास्क दिला. टास्कदरम्यान करण कुंद्राने एक मॅप शोधून काढला. शिवाय प्रतिक सहजपाल (Pratik Sehajpal), शमिता शेट्टी व निशांत भट यांच्यात फूट पाडण्यातही तो यशस्वी झाला. प्रतिक, शमिता व निशांतमध्ये जुंपली अन् करण कुंद्राचा फायदा झाला. शमिताने मॅपचा तुकडा करण कुंद्राला दिला. हे कळताच प्रतिक जाम भडकला. इतका की वॉशरूमचा लॉक तोडण्याचा प्रयत्नही त्याने केला. करणने त्याला रोखले. पण नंतर स्क्रू ड्रायव्हरने त्याने लॉक तोडलाच. विधी पांड्या (Vidhi Pandya) गार्डन एरियातील एका वॉशरूममध्ये आंघोळ करत असताना प्रतिक सहजपाल वॉशरूमचा लॉक तोडतो. विधी वॉशरूममधून आल्यावर करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुशाली व अन्य सर्वांना याबाबत तक्रार करते आणि मग पुन्हा राडा सुरू होतो.

वाचा संबंधित बातमी

OMG! आंघोळ करत होती विधी पांड्या, प्रतिकने तोडला बाथरूमचा लॉक,‘Bigg Boss 15’मध्ये नवा राडा

Read in English

Web Title: Bigg Boss 15: Salman Khan angry on Pratik Sehajpal for the Vidhi Pandya incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.