बिग बॉस : एंडीने काढली मनू पंजाबीची लायकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 20:47 IST2017-01-01T20:47:33+5:302017-01-01T20:47:33+5:30

बिग बॉस सिजन-७ चा एक्स स्पर्धक वीजे एंडी मनू पंजाबीवर चांगलाच भडकला. ट्विटच्या माध्यमातून त्याने मनू हा घृणास्पद असून, ...

Big Boss: Andy has removed Manu Punjabi's suitability | बिग बॉस : एंडीने काढली मनू पंजाबीची लायकी

बिग बॉस : एंडीने काढली मनू पंजाबीची लायकी

ग बॉस सिजन-७ चा एक्स स्पर्धक वीजे एंडी मनू पंजाबीवर चांगलाच भडकला. ट्विटच्या माध्यमातून त्याने मनू हा घृणास्पद असून, तो तिरस्कार करण्याच्याच लायकीचा असल्याचे त्याने म्हटले.ट्विटच्या माध्यमातून वीजे एंडी म्हणाला की, बिग बॉस सिजन १० मध्ये माझा सर्वाधिक फेव्हरेट कंटेस्टेंट मनवीर गुर्जर आहे. मात्र मनू त्याचा कठपुतलीसारखा वापर करत आहे. मनवीरच्या वडिलांनी त्याला मनूपासून दूर राहण्याची चेतावणी दिली होती, मात्र तो मूर्ख आहे. मनू हा तिरस्कार करण्याच्याच लायकीचा आहे, अशा शब्दात एंडीने मनूवर राग व्यक्त केला. 

#manveergurjar WAS a fav, he's #ManuPunjabi puppet! His father warned him but he's an idiot. Manu is disgusting. @BiggBoss#BB10— Andy (@iAmVJAndy) December 31, 2016 ">http://

}}}}
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी कुशल टंडन याने ट्विट करून बानी जे हिला इरिटेटिंग कंटेस्टेंट असे म्हटले होते. त्याचे एंडीने समर्थन केले. तो म्हणाला की, बानी खरोखरच इरिटेटिंग कंटेस्टेंट आहे. एंडी हा बिग बॉस सीजन ७ चा फेव्हरेट कंटेस्टेंट होता. त्याचे शोमधील कारणामे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता त्याने मनू पंजाबी याच्याविषयी व्यक्त केलेले मत प्रेक्षकांनाही आवडेल का नाही, हे मनूच्या घरातील प्रवासावरच अवलंबून आहे.  



खरं तर शोच्या सुरुवातीपासून मनू आणि मनवीर यांची चांगली मैत्री जमली आहे. दोघेही घरातील स्ट्रॉँग कंटेस्टेंट आहेत. मात्र मनवीर हा मनूच्या सल्ल्याने घरात राहत असल्याने प्रेक्षकांना ती बाब सातत्याने घटकत आहे. एव्हाना जेव्हा मनवीरच्या वडिलांनी घरात प्रवेश केला होता, तेव्हा त्याला मनूपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र मनू अजूनही मनवीरच्याच सल्ल्याने गेम खेळत असल्याने त्याचा घरातील प्रवास किती काळ असेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Big Boss: Andy has removed Manu Punjabi's suitability