अर्शी बेगम दिसणार पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 11:53 IST2018-03-01T06:23:02+5:302018-03-01T11:53:02+5:30

कलर्सच्या बिग बॉस 11 या रिअॅलिटी शो मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविणारी अर्शी खान या चॅनेलच्या इश्क में मरजावां या ...

Arshi Begum will appear again on small screens | अर्शी बेगम दिसणार पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर

अर्शी बेगम दिसणार पुन्हा एकदा झळकणार छोट्या पडद्यावर

र्सच्या बिग बॉस 11 या रिअॅलिटी शो मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळविणारी अर्शी खान या चॅनेलच्या इश्क में मरजावां या सूड गाथेत छोट्या मुख्य भूमिकेतून परत येत आहे. मनोरंजन अजूनच वाढविण्यासाठी, अर्शी होळीच्या पार्टी मध्ये नाच गाण्याच्या टोळी तून प्रवेश करणार आहे. तिच्या भूमिके विषयी विचारले असता अर्शी खानने सांगीतले, “ ज्या चॅनेल ने आजच्या मी पर्यंत मला नेले आहे त्या चॅनेल वर परत येण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. या भूमिकेतून मी माझ्या अवाम ला माझे लटके आणि झटके घेऊन पुन्हा येत आहे. मला नाटक अतिशय आवडते आणि आज टेलिव्हिजन वर सर्वात चांगला चालणारा शो असणाऱ्या इश्क में मरजावां मधून माझ्या अदा दाखविण्याची मी वाट पहात आहे. अपारंपारिक कथा असलेली या शो ची कथा आणि आरोहीच्या सूडाच्या गाथे मध्ये सहभागी होणे मला आवडले आहे. माझ्या चाहत्यांच्या प्रतिसादाची मी आता वाट
पहात आहे.” 

इश्क में मरजावां शो मध्ये अर्जुन बिजलानी दीपच्या भूमिकेत तर अलिशा पवार आरोही व तारा अशा दोन भूमिका करत आहे. विनीत रैना अभिनीत विराट/लक्षच्या वाईट कामांवरील पडदा हटविण्याची योजना आरोही आखते आहे आणि त्यात अर्शी खानची भूमिका सहायक आहे. आरोहीच्या सूडाच्या लढाईत अर्शीच्या प्रवेशाची कितपत मदत होईल?
 
ऐवढेच नाही तर चर्चा खरी मानाल तर लवकरच अर्शी एका रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये मजेशीर अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर ती नव नव्या आव्हानांशी लढताना दिसेल. होय, अर्शी लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या नवव्या सीझनमध्ये दिसू शकते, असे कळतेय. अर्शी कॉमन मॅन बनून ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली होती. सध्या अर्शी आपल्या फिटनेसवर सर्वाधिक लक्ष देत आहे. जिममध्ये ती तासन तास घाम गाळत आहे. आता ही तयारी तिच्या चित्रपटासाठी आहे की ‘खतरों के खिलाडी’च्या सीझन ९ साठी आहे, हे तिलाच ठाऊक़

Web Title: Arshi Begum will appear again on small screens