अर्चना-अबीश 'कूूल' कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:19 IST2016-01-16T01:14:42+5:302016-02-10T14:19:36+5:30

सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करीत स्टँडिंग कॉमेडीयन अशी ख्याती मिळविणारा अबीश मॅथ्यू सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा साखरपुडा दक्षिण ...

Archana-Abish 'Cool' Couple | अर्चना-अबीश 'कूूल' कपल

अर्चना-अबीश 'कूूल' कपल

शल मीडियाचा पुरेपुर वापर करीत स्टँडिंग कॉमेडीयन अशी ख्याती मिळविणारा अबीश मॅथ्यू सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा साखरपुडा दक्षिण भारतीय अभिनेत्री अर्चना कावी हिच्याशी झाला.

या साखरपुड्याचे शानदार फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, हे फोटो 'फनी ' असल्याने याला बरीच पसंती मिळत आहे. अबीशला अर्चनाची चांगली साथ मिळाल्याने दोघेही कूल कपल म्हणून कमेंट मिळवित आहेत.

अर्चना व अबीश यांच्यात बालपणापासून मैत्री आहे. या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाल्यावर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांच्या संमतीने त्यानी साखरपुडा पार पाडला. या कार्यक्रमात दोघांचे ही आई-वडील, नातेवाईक व जवळचे मित्र उपस्थित होते. अर्चनाने जरीदार कांजीवरम साडी व अँटिक ज्वेलरी परिधान केली होती. कंमरबंधामुळे तिला खास लूक मिळाला होता.

अबीशने रेशमी धोती, डार्क ग्रीन कुर्ता व त्यावर मेहंदी रंगाचे प्रिंटेड जॅकेट परिधान केले होते. कॉमेडिअन म्हणून अबीशने अनेकदा लग्न व जोडप्यांची टर्र उडविली आहे. मात्र त्याने अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपला कॉमेडी अंदाज त्याने साखरपुड्या दरम्यान कायम राखला. अर्चना मल्याळम चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ख्यात आहे तर अबीश ऑल इंडिया बकचोद (एआयबी) या कार्यक्रमात सहभागी आहे.

Photo source : Cispeake Productions

Web Title: Archana-Abish 'Cool' Couple