'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 09:13 IST2024-04-28T09:11:50+5:302024-04-28T09:13:02+5:30

अनेक सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीला या गाण्याची भुरळ पडली आहे. 

anita date and sandeep pathak dance on viral gulabi sadi song watch video | 'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंड होत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून गुलाबी साडीची हवा सोशल मीडियावर आहे. काही केल्या या गाण्याची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये. इन्स्टाग्राम उघडलं की 'गुलाबी साडी' गाण्यावरचे रील्स दिसतात. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीला या गाण्याची भुरळ पडली आहे. 

'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  या जोडीने 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत गुलाबी साडी नेसून आनंदी गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहे. तर अंताजीनेही तिला डान्समध्ये उत्तम साथ दिली आहे. आनंदी-अंताजीचा 'गुलाबी साडी' गाण्यावरचा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

'इंद्रायणी' मालिकेत अभिनेत्री अनिता दाते आनंदी आणि अभिनेता संदीप पाठक अंताजीच्या भूमिकेत आहे. संदीप पाठकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन गुलाबी साडीवरील व्हिडिओ शेअर केला आहे. "आनंदी आणि अंताजीचा गुलाबी साडीवर डान्स", असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. अल्पावधीतच इंद्रायणी मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 

Web Title: anita date and sandeep pathak dance on viral gulabi sadi song watch video