"सलमान भाऊ सुद्धा आहेत..."; 'राजा शिवाजी' सिनेमात दिसणार भाईजान, रितेशकडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 21:49 IST2026-04-19T21:44:42+5:302026-04-19T21:49:59+5:30

ग्रँड फिनालेनिमित्त रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं. त्यावेळी अभिषेकने 'राजा शिवाजी' बद्दल रितेशचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी जिनिलिया देशमुखच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

Abhishek Bachchan praises Riteish deshmukh for the Raja Shivaji movie genelia deshmukh emotional | "सलमान भाऊ सुद्धा आहेत..."; 'राजा शिवाजी' सिनेमात दिसणार भाईजान, रितेशकडून मोठी घोषणा

"सलमान भाऊ सुद्धा आहेत..."; 'राजा शिवाजी' सिनेमात दिसणार भाईजान, रितेशकडून मोठी घोषणा

'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले आज सुरु आहे. या सोहळ्यात एक भावुक क्षण बघायला मिळाला. ते म्हणजे या ग्रँड फिनालेनिमित्त रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलं. त्यावेळी निर्माती म्हणून जिनिलिया देशमुख आणि सिनेमात भूमिका साकारणारा अभिषेक बच्चन मंचावर उपस्थित होते. त्यावेळी अभिषेकने 'राजा शिवाजी' बद्दल रितेशचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी जिनिलिया देशमुखच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

रितेशने ग्रँड फिनालेच्या मंचावर अभिषेक बच्चनचे आभार मानले.  'राजा शिवाजी' सिनेमात काम करण्यासाठी अभिषेकने लगेच होकार दिला. अभिषेक आणि रितेश एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखत आहेत. रितेश अभिषेकला मोठा भाऊ मानतो. त्यामुळे या सिनेमात काम करण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी मी आयुष्यभर अभिषेकचा ऋणी राहील, असं रितेश म्हणाला.

पुढे अभिषेकनेही रितेशचं आणि  'राजा शिवाजी' सिनेमाचं कौतुक केलं. याशिवाय सलमान भाऊ सुद्धा सिनेमात आहेत, असंही रितेश म्हणाला. त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आणि सर्वांना आनंद झाला.
 
'राजा शिवाजी'च्या सेटवर पूजा व्हायची. हा सिनेमा अनेक अर्थांनी वेगळं आहे. हे रितेशने पाहिलेलं एक स्वप्न आहे. जे आज पूर्ण होतंय. हा सिनेमा यावर्षाचा नंबर १ सिनेमा ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंधूंबद्दल मला यानिमित्त जाणून घेण्याची संधी मिळाली. रितेशच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा आनंद मिळाला, अशा शब्दांत अभिषेकने रितेशचं कौतुक केलं. अभिषेक हे बोलत असताना जिनिलियाच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. रितेशनेही अभिषेकला कडकडून मिठी मारली प्रेम दर्शवलं.  'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ ला रिलीज होणार आहे.

Web Title : 'राजा शिवाजी' में सलमान खान; रितेश की घोषणा, अभिषेक ने की प्रशंसा

Web Summary : रितेश देशमुख ने 'बिग बॉस मराठी' के फिनाले में 'राजा शिवाजी' में सलमान खान की भूमिका की घोषणा की। अभिषेक बच्चन ने रितेश की दूरदृष्टि की प्रशंसा की, जिससे जेनेलिया देशमुख भावुक हो गईं। फिल्म 1 मई, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Salman Khan in 'Raja Shivaji'; Riteish Announces, Abhishek Praises

Web Summary : Riteish Deshmukh announced Salman Khan's role in 'Raja Shivaji' at 'Bigg Boss Marathi' finale. Abhishek Bachchan praised Riteish's vision, moved Genelia Deshmukh to tears. The film releases May 1, 2026.