सनी लिओन कुठे आणि मी कुठे - राखी सावंत

By Admin | Updated: April 17, 2015 12:56 IST2015-04-17T12:14:18+5:302015-04-17T12:56:12+5:30

मी माझ्यामुळे लोकप्रिय झाले असून यासाठी मला अॅडल्ट फिल्म करावी लागली नाही अशी खोचक प्रतिक्रिया राखी सावंतने दिली आहे.

Sunny Leone where and where I am - Rakhi Sawant | सनी लिओन कुठे आणि मी कुठे - राखी सावंत

सनी लिओन कुठे आणि मी कुठे - राखी सावंत

>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १७ - बोल्ड आणि बिनधास्त गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत आता सनी लिओनचे नाव ऐकलं की संतापते. सनी लिओन व माझी तुलना होऊच शकत नाही असे तिने म्हटले आहे.
राखी सावंत आता एका नवीन व्हिडीओ अल्बममध्ये झळकणार असून या व्हिडीओत राखीचा बोल्ड अंदाज पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान राखी सावंतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सनी लिओनने तुझ्यासमोर आव्हान निर्माण केले आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच राखीचा पारा चांगलाच चढला. राखी म्हणाली, आपण भारतीय सनी लिओनसाठी समाजसेवा करतोय. आपण तिला कपडे घालण्यासाठी पैसे देतोय. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजलाच असाल असे सूचक विधानही राखीने केले.
सनी लिओन व माझी तुलना होऊच शकत नाही. मी माझ्या नृत्याने व कामाने लोकप्रिय झाले व प्रेक्षकांचे मन जिंकू शकले. मला यासाठी कधीही अॅडल्ट चित्रपट किंवा अन्य काही करावे लागले नाही असे स्पष्टीकरणही राखीने दिले आहे. 

Web Title: Sunny Leone where and where I am - Rakhi Sawant