पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, घर मोडण्याच्या मार्गावर, आता मुलानेही दिला विजयला धक्का, उचललं असं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:59 IST2026-03-01T16:46:51+5:302026-03-01T16:59:57+5:30
Vijay Thalapathy: तामिळ चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार आणि तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्या कौटुंबिक जीवनात सध्या मोठं वादळ आलं आहे.

पत्नीकडून घटस्फोटासाठी अर्ज, घर मोडण्याच्या मार्गावर, आता मुलानेही दिला विजयला धक्का, उचललं असं पाऊल
तामिळ चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार आणि तामिळनाडूच्या राजकारणात नव्याने आलेल्या टीव्हीके पक्षाचा प्रमुख थलपती विजय याच्या कौटुंबिक जीवनात सध्या मोठं वादळ आलं आहे. एकीकडे विजयचा जन नायगन हा शेवटचा चित्रपट सेंसॉर बोर्डाच्या अडथळ्यामुळे अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. दुसरीकडे २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. याचदम्यान आता थलपती विजयच्या मुलानेही त्यााल मोठा धक्का दिला असून, त्याने विजयला सोशल मीडियावर अनफॉलो करत वडिलांसोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार थलपती विजयची पत्नी संगीता हिने न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी खटला दाखल केला आहे. तसेच विजय याचे एका अभिनेत्रीशी असलेले विवाहबाह्य संबंध हे घटस्फोटाचं कारण सांगण्यात आलं होतं. मात्र विजय आणि संगिता यांच्यापैकी कुणीही याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र या वृत्तामुळे विजयच्या फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. तसेच विजयच्या विवाहबाह्य संबंधांचं कारण ठरलेली अभिनेत्री कोण? याचा शोध आता फॅन्स घेत आहेत.
याचदरम्यान, थलपती विजयचा मुलगा जेसन संजय याने विजया सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. विजय आणि संगीता हे एकमेकांपासून वेगळे होत असल्याचं वृत्त आल्यानंतर ही माहिती समोर आल्याने आता याच कारणामुळे मुलगा जोसेफ संजय याने वडील थलपती विजय याला अनफॉलो केलं असावं असा तर्क लढवत आहे.
थलपती विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाचं वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर जेसन संजय याची फॉलोईंग लिस्ट तपासली. त्यामध्ये विजय याचं नाव दिसून आलं नाही. मात्र जोसेफ संजय हा आधीपासूनच विजय याला फॉलो करत नसल्याचे काही जण सांगत आहेत. तसेच विजयचं इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा कुणालाही फॉलो करत नसल्याचं समोर आलं आहे.