प्रेमाच्या नादात उद्धवस्त झालं 'बाहुबली' फेम अभिनेत्रीचं करिअर, लग्नापूर्वीच करावं लागलं अबॉर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:55 IST2026-04-14T11:54:33+5:302026-04-14T11:55:11+5:30
Ramya Krishnan: मात्र, यशाच्या शिखरावर असतांनाच रम्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तिच्या करिअरची वाट चुकली.

प्रेमाच्या नादात उद्धवस्त झालं 'बाहुबली' फेम अभिनेत्रीचं करिअर, लग्नापूर्वीच करावं लागलं अबॉर्शन
साऊथसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे राम्या कृष्णन. नजरेतील धारदारपणा, सौंदर्य आणि उत्तम अभिनय कौशल्य यांच्या जोरावर राम्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अभिनयामुळे चर्चेत येणारी बाहुबलीची ही शिवगामी खऱ्या आयुष्यातही तितकीच चर्चेत आली. राम्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. ज्याचा परिणाम तिच्या करिअरवर सुद्धा झाला होता.
९०च्या दशकात राम्या तिच्या बोल्डनेसमुळे बऱ्याचदा चर्चेत यायची. इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता ज्यावेळी राम्याचा प्रचंड मोठा दबदबा होता. मात्र, यशाच्या शिखरावर असतांनाच तिच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तिच्या करिअरची वाट चुकली.
राम्या त्याकाळी साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय, यशस्वी आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. याच काळात तिचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक के.एस. रविकुमार यांच्यासोबत जोडलं गेलं. या जोडीने अनेक सिनेमांसाठी एकत्र काम केलं होतं. विशेष म्हणजे याच काळात त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. मात्र, त्यावेळी रविकुमार हे विवाहित होते. त्यामुळे राम्या आणि त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. विशेष म्हणजे रविकुमार यांच्या प्रेमात असलेली राम्या लग्नापूर्वीच प्रेग्नंट झाली. त्याकाळी लग्नापूर्वी एखादी अभिनेत्री आई होणार ही गोष्ट फार मोठी समजली जात होती. या सगळ्याचा परिणाम तिच्या करिअरवर झाला.
राम्याने केला गर्भपात?
सूत्रांच्या माहितीनुसार, रविकुमार यांनी राम्याला गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. सोबतचच कुटुंबीय आणि समाज यांच्याकडून होणाऱ्या सततच्या दबावामुळे राम्याने गर्भपात करायचा निर्णय घेतला. या घटनेनंतर राम्या आणि रविकुमार यांच्या नात्यात वितुष्ट आलं. त्यानंतर राम्या पुन्हा एकदा दिग्दर्शक कृष्णा वामसी यांच्या प्रेमात पडली. या जोडीने २००५ मध्ये लग्नगाठ बांधली. आज या जोडीला एक मुलगादेखील आहे. राम्याने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. यात खासकरुन बाहुबली या सिनेमातील तिची शिवगामी ही भूमिका विशेष गाजली.