जान्हवी कपूर नव्हे तर 'पेड्डी' सिनेमात दिसली असती बहीण खुशी, 'या' कारणामुळे झाला पत्ता कट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:28 IST2026-05-16T17:25:13+5:302026-05-16T17:28:46+5:30

बहिणीला संधी मिळालेली, पण...; ३०० कोटींच्या पेड्डी सिनेमात 'अशी' झाली जान्हवी कपूरची एन्ट्री, नेमकं कुठे बिनसलं?

khushi kapoor was first choice for achiyyamma role in ram charan peddi cinema then it went to janhavi kapoor | जान्हवी कपूर नव्हे तर 'पेड्डी' सिनेमात दिसली असती बहीण खुशी, 'या' कारणामुळे झाला पत्ता कट!

जान्हवी कपूर नव्हे तर 'पेड्डी' सिनेमात दिसली असती बहीण खुशी, 'या' कारणामुळे झाला पत्ता कट!

Janhvi Kapoor Peddi Cinema:हिंदी सिनेसृष्टीतील परमसुंदरी म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यासह चित्रपटांमुळे तितकीच चर्चेत असते. बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी जान्हवी सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. देवरा पार्ट-१ नंतर लवकरच ती साऊथ स्टार रामचरणसोबत  पेड्डी या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे अभिनेत्रीबद्दल सिनेवर्तुळात चर्चा सुरु आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर ‘अचियम्मा’ नावाची भूमिका साकारत आहे. पण, तुम्हाला माहितीये का? या चित्रपटासाठी जान्हवी कपूर पहिली पसंती नव्हती. निर्मात्यांना राम चरणच्या विरुद्ध जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरला ऑफर देण्यात आली होती.मात्र, अखेरीस या भूमिकेसाठी जान्हवीची निवड करण्यात आली. पेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. 

सध्या राम चरण आणि जान्हवीच्या पेड्डी सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. येत्या ४ जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 'एम 9'ला दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी पेड्डी च्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला. ते म्हणाले, "मी सुरुवातीला चित्रपटाची कथा खुशी कपूरला ऐकवली. पण जेव्हा मी तिला प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की ती त्या भूमिकेसाठी खूपच लहान आहे."

मग पुढे ते म्हणाले," त्यानंतर मला त्याच घरात जाऊन जान्हवीला कथा सांगावी लागली. तो क्षण माझ्यासाठी खूप अवघड होता.मी जान्हवीला स्पष्ट सांगितलं की खुशीला का नकार दिला. मी खुशीला भेटून ‘हाय’ म्हटलं आणि सांगितलं की मला या भूमिकेसाठी तिच्याऐवजी जान्हवी हवी आहे.मला याचं खूप वाईट वाटलं, पण सिनेमात कधी कधी अशा कठीण निर्णयांची गरज असते. ” असेही त्यांनी सांगितलं.

बुची बाबू सना पुढे म्हणाले, " सुरुवातीपासूनच मला माहित होते की या भूमिकेत जान्हवी फिट बसेल. मी इतरांना कथा सांगत असतानाही,माझ्या डोळ्यासमोर अचियम्माच्या भूमिकेत जान्हवीच होती."

Web Title : जाह्नवी से पहले खुशी कपूर को मिला था 'पेड्डी' का ऑफर, ये थी वजह!

Web Summary : जाह्नवी कपूर 'पेड्डी' में अचियम्मा की भूमिका निभा रही हैं, लेकिन पहले खुशी पर विचार किया गया था। निर्देशक बुची बाबू सना को खुशी भूमिका के लिए बहुत छोटी लगीं, जिसके कारण 4 जून को रिलीज़ हो रही राम चरण अभिनीत फिल्म में जाह्नवी को लिया गया।

Web Title : Khushi Kapoor was offered 'Peddi' before Janhvi, here's why she lost it!

Web Summary : Janhvi Kapoor stars in 'Peddi' as Achiyamma, but initially, sister Khushi was considered. Director Buchi Babu Sana felt Khushi was too young for the role, leading to Janhvi's casting in the Ram Charan starrer film releasing on June 4th.