प्रियांकाचा रॉयल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:17 IST2018-05-31T10:16:55+5:302018-05-31T10:17:29+5:30

शाही लग्नातला प्रियांकाचा लूक का गाजला ?

Priyanka's Royal Look | प्रियांकाचा रॉयल लूक

प्रियांकाचा रॉयल लूक

- श्रुती साठे 
प्रिन्स हॅरी आणि मेघनचं शाही लग्न, तिचा महागडा गाऊन, शाही लग्नाचा थाट, खर्च या सगळ्या गोष्टींचे खूप कौतुक झाले ! बॉलिवूडची स्टार, देसी गर्ल द वन अँड ओन्ली. प्रियांका चोप्रा या या शाही सोहळ्याला हजर होती. त्या सोहळ्यात तिनं साडी का नेसली नाही, विदेशी पोशाख का केला यावरून बरीच टिका झाली, ट्रोलिंग झाली. अनेकांनी तिच्या स्टाइलचं कौतुकही केलं.
खरंतर या लग्नात महिलांसाठी डे ड्रेस विथ हॅट आणि पुरुषांसाठी लाउंज सूट असा ड्रेसकोड होता. पुरुषांच्या लाउंज सूटमध्ये काळ्या अथवा करड्या रंगाची फॉर्मल पॅन्ट, कोट, वेस्ट कोट, फॉर्मल शूज इत्यादी गोष्टी येतात. स्त्रियांसाठी असलेल्या ड्रेस कोडमध्ये येतात. थोडासा फॉर्मल लूक असलेला किमान गुडघ्यापर्यंत, मिडी लेंग्थ किंवा फुल लेंग्थ ड्रेस आणि त्यासोबत हॅट या गोष्टी.

प्रियांकाचा फिक्या लव्हेंडर रंगातला ड्रेस अतिशय सुरेख दिसला. फुल स्लीव्हज्, जॅकेट लूक, आणि क्लीन फिट हे सारेच देखणे होते. ड्रेसकोडचा नियम पाळून प्रियंकाने मॅचिंग हॅट वापरली. बारीक जाळी आणि मागे सुंदर फुलं असलेली ही हॅट एकदम रॉयल दिसली. सोबत वापरलेले स्ट्रॅपी हिल्स आणि हातातला क्लच सुरेख होते.

लग्नांनंतरच्या रिसेप्शनमध्ये आपल्या लाडक्या देसी गर्लने चमचमत्या डिझायनर गाऊनने सगळ्यांचे डोळे दिपवून टाकले ! आॅफशोल्डर असलेला हा गाऊन त्याच्या आतून गडद रंगाचं लायनिंग आणि वरून सोनेरी पातळ चमचमणारा घेर यामुळे खुलून दिसला. साधी हेअरस्टाइल, चमचमते कानातले आणि छोटी पर्स वापरून तिनं आपला लूक पूर्ण केला.
सकाळी परफेक्ट रॉयल लूक आणि रिसेप्शनला एकदम हटके पार्टी लूक असा तिचा पोषाख. स्टाइल म्हणून तो उत्तमच होता.

sa.shruti@gmail.com 

Web Title: Priyanka's Royal Look